भास्करराव पाटील खतगावकर हे तीन वेळा खासदार आणि तीन वेळा आमदार राहिले आहेत. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे ते सख्ख्ये दाजी आहेत. एक मुरब्बी नेता म्हणून भास्करराव पाटील खतगावकर यांची ओळख आहे. जिल्ह्यातील नायगाव आणि देगलूर मतदारसंघात त्यांची मजबूत पकड आहे. बराच काळ काँग्रेसमध्ये राहिल्यानंतर त्यांनी वर्ष २०१५ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर पुन्हा ते काँग्रेसमध्ये स्वगृही परतले.
उमेदवारीसाठी प्रयत्नशील होते पण…
दरम्यान, लोकसभा निवडणुकीपूर्वी अशोक चव्हाण यांनी भाजपत प्रवेश केल्यानंतर खतगावकर देखील आपल्या समर्थंकासह भाजपात आले. आपल्या सुनबाईला लोकसभेची उमेदवारी मिळावी, यासाठी ते प्रयत्नशील होते. उमेदवारीबाबत मीनल खतगावकर यांनी निवडणुकीच्या काळात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट देखील घेतली होती. मात्र फडणवीस यांच्या आश्वासनानंतर त्यांनी उमेदवारीच्या स्पर्धेतून माघार घेतली.
खतगावकर भाजपला सोडचिठ्ठी देणार
नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषदेत मीनल खतगावकर यांना संधी मिळेल अशी अपेक्षा होती, पण त्यांना संधी काही मिळाली नाही. त्यामुळेच माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर हे नाराज असल्याचे बोलले गेले. याच नाराजीमुळे खतगावकर हे भाजपला सोडचिठ्ठी देणार असल्याची चर्चा आहे.
अशोकराव चव्हाण यांना तगडा झटका बसणार
दुसरीकडे, त्यांच्या सुनबाई डॉ. मीनल पाटील खतगावकर यांनी नायगाव विधानसभा मतदार संघातून अपक्ष निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. गावोगावी गाठीभेटी देखील त्या देत आहेत. त्यामुळे भाजपला विशेष करून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना धक्का तगडा बसणार आहे.