अमोल मिटकरी काय म्हणाले?
“मनसे सरचिटणीस कर्णबाळा सुरुवातीपासूनच पळकुटा होता. मिशीला हात पिळ देऊन मांड्या ठोकणारा आज मोबाईल बंद करून ठेवतोय.. लवकरच गजाआड करू, हा अकोला पोलिसांचा शब्द होता. म्हणून कालचं आंदोलन मागे घेतलं” असं अमोल मिटकरी म्हणाले.
“अमोल मिटकरीची गाडी फोडू शकतात, त्यांच्यात दम असेल तर आदित्य ठाकरेंना हात लावून दाखवा… त्यांनी सुद्धा सुपारी बहाद्दर म्हटलं आहे.” असं चॅलेंजच मिटकरी यांनी मनसे कार्यकर्त्यांना दिलं आहे.
रेल्वे इंजिनचा धूर जाईल
“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगणं आहे की त्यांचे लाड करू नका. असा पक्ष सोबत घेतलास जनता मतदान कसं करणार? महायुतीत सडके आंबे नको. त्यांना मोकाट सोडा. त्यांची औकात दिसून जाईल. जो धूर निघतोय रेल्वे इंजिनचा तोही चालला जाईल. असा पक्ष सत्तेत सोबत असणे विनाशकारी विपरीत बुद्धी असेल महायुतीची” असे कडक शब्दात ताशेरे अमोल मिटकरी यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षावर ओढले आहेत.
जय मालोकार राष्ट्रवादीत येणार होता
दरम्यान, मनसे पदाधिकारी जय मालोकार याच्या मृत्यूबद्दल अमोल मिटकरींनी धक्कादायक आरोप केले आहेत. जय मालोकार काही दिवसातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार होता. तो त्या राड्यात देखील सहभागी होता, पण त्याने काहीच केलं नाही, मागे शांत होता, असा दावा मिटकरींनी केला.
जय मालोकारची राष्ट्रवादीत प्रवेश घेण्याची इच्छा होती. अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबई येथे प्रवेश झाला पाहिजे, असे जिल्हाध्यक्षांच्या सोबत तो बोललाही होता, असंही मिटकरी म्हणाले.
जय मालोकारच्या मृत्यूला मनसेचा कर्णबाळाच जबाबदार आहेत. लवकर सर्व खुलासे उघड होतील अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. मृत्यूच्या वेळी जय मालोकारसोबत कोण होतं. नेमकं राड्यानंतर काय घडलं? याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही अमोल मिटकरी यांनी केली.