गजानन काळे यांची पोस्ट काय?
“अजित दादा आणि सुनील तटकरे यांना विनंती… हवे तर या घासलेट चोराचा आगाऊ ५० हजार रुपये पगार आम्ही देतो… पण, काही ही बडबड करून राजकारण नासवणाऱ्या अमोल मिटकरी या भैताडाच्या पेकाटात लाथ घालून त्याला कायम स्वरूपी ‘बिग बॅास’ मध्ये पाठवावे… त्याची उचित जागा ‘बिग बॅास’ मध्ये आहे… #नौटंकीसाला… आणि हो मुख्यमंत्र्यांचा कॉल आला का रे घासलेट चोरा???” असं गजानन काळे यांनी ‘एक्स’ सोशल मीडियावर लिहिलं आहे.
अमोल मिटकरी काय म्हणाले होते?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मला अद्याप फोन आला नाही, मला अपेक्षा होती, की मी महायुतीतील एक घटक म्हणून त्यांनीसुद्धा विचारपूस करायला हवी होती. राज्याचे प्रमुख या नात्याने त्यांनी विचारपूस करणं महत्त्वाचं होतं. मुख्यमंत्री असले की सामान्य माणूस असो, सत्तेतला आमदार असो किंवा विरोधी पक्षातला आमदार, भ्याड हल्ला करणारे गुंड सुटतात, तेव्हा मुख्यमंत्र्यांनी चौकशी करायला पाहिजे, ती अद्याप झाली नसल्याचं सांगायला मी यत्किंचितही घाबरत नाही, असं अमोल मिटकरी काल अकोल्यात माध्यमांशी बोलताना म्हणाले होते.
“कोण कुठला राज ठाकरे”
“ज्या प्रमाणे त्या राज ठाकरेवर (एकेरी) बोलल्यावर त्याचे टुकार गुंड बोलतात.. अजित दादांवर बोलल्यावर आपल्या पक्षातील नेत्यांनी तोंड उघडावं, अजित दादा माझे नेते आहेत, इतकीच भूमिका फक्त घेऊ नये, कोण कुठचा राज ठाकरे, आमच्या अजित दादांवर बोलतो आणि तुम्ही शांत आहात” असंही मिटकरी काल म्हणाले होते.