अनिल देशमुख पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे, CBIकडे पुरावे; सचिन वाझेचे खळबळजनक आरोप

मुंबई: अँटिलिया स्फोटक आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटकेत असलेला माजी पोलीस अधिकारी सचिन वाझेनं माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अनिल देशमुख गृहमंत्री असताना त्यांच्या पीएच्या माध्यमातून पैसे घेत होते. याबद्दलचे पुरावे सीबीआयकडे आहेत. मी या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलेलं आहे. मी नार्को टेस्टसाठी कधीही तयार आहे, असं म्हणत वाझेनं एकच खळबळ उडवून दिली आहे.

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना विरोधी पक्षनेते असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी आपल्यावर दबाव टाकला होता. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अनिल परब आणि अजित पवार यांच्यावर आरोप करणारी शपथपत्र देण्यासाठी फडणवीसांनी दबाव टाकला. पण त्या दबावाला भीक न घातल्यानं मला खोट्या प्रकरणात तुरुंगात टाकण्यात आलं, असे सनसनाटी आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी केले होते. त्या आरोपाला फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं. यानंतर आता या प्रकरणात मुंबई पोलीस दलातील निलंबित अधिकारी सचिन वाझेनं देशमुखांवर गंभीर आरोप केले आहेत.
Prakash Ambedkar: चिल्लर लोकांच्या नको, राज्यातील ४ प्रमुख नेत्यांच्या गाड्या फोडा! आंबेडकरांनी नावं सांगितली
अनिल देशमुख गृहमंत्री असताना त्यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे आरोप झाले होते. बार, स्पा रात्री उशिरापर्यंत सुरु ठेऊ देण्याच्या बदल्यात त्यांच्याकडून पैसे वसूल करण्याचे टार्गेट पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आलं होतं, असे आरोप विरोधी पक्षात असताना फडणवीसांनी केले होते. आता याच प्रकरणात सचिन वाझेनं देशमुखांवर आरोप केले आहेत. ‘त्यावेळी जे काही झालं, त्याचे पुरावे आहेत. पीएच्या माध्यमातून देशमुखांपर्यंत पैसे पोहोचायचे,’ असा गंभीर आरोप पोलिसांच्या अटकेत असलेल्या वाझेनं केला आहे.

‘सीबीआयकडे याबद्दलचे पुरावे आहेत. मी या प्रकरणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलं आहे. मी सगळे पुरावे जमा केलेले आहेत. मी नार्को टेस्टसाठी कधीही तयार आहे. मी त्या पत्रात जयंत पाटील यांचंही नाव नमूद केलं आहे,’ असं वाझेनं म्हटलं. पोलीस घेऊन जात असताना वाझेनं माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. पण तरीही वाझे माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होता.

Source link

anil deshmukhantilia bomb scare caseDevendra Fadnavissachin wazeअँटिलिया स्फोटके प्रकरणअनिल देशमुखदेवेंद्र फडणवीसमनसुख हिरेनसचिन वाझे
Comments (0)
Add Comment