मागील वर्षी यवतमाळ जिल्ह्यात जुलैपर्यंत सरासरी ८१ टक्के पीककर्ज वाटप करण्यात आले होते. शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने उद्दिष्टापेक्षा अधिक; १०५ टक्के कर्जवाटप शेतकरी सभासदांना केले होते. यंदा जिल्हा बँकेने ७९ टक्के पीककर्ज वाटप केले आहे. नापिकीतही प्रामाणिकपणे जिल्हा बँकेचे कर्जफेड करणारे २१ हजार शेतकरी कर्जापासून वंचित आहेत.
यवतमाळ हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा आहे. सततच्या नापिकीमुळे अनेकदा हंगामाच्या सोयीसाठी गाठीला काहीही उरत नाही. या परिस्थितीत हंगामाच्या सुरुवातीपासून शेतकऱ्यांना पैशांची गरज भासते. कर्जासाठी शेतकरी बँकेकडे धाव घेतो. बँकेने कर्ज नाकारल्यास सावकाराच्या दारी जावे लागत असल्याची माहितीही सूत्रांनी दिली.
शेतकऱ्यांच्या व्याज परताव्याची रक्कम राज्य व केंद्र सरकारकडून येणे बाकी आहे. इतरही काही अडचणी आहेत. काही दिवसांपूर्वी जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष पाटील व काही संचालकांनी पालकमंत्री संजय राठोड यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन अडचणी मांडल्या. त्यांनी सकारत्मक प्रतिसाद दिल्याने लवकरच निधी मिळणार आहे. यानंतर उर्वरित शेतकऱ्यांना कर्जवाटप सुरू होईल. – अरविंद देशपांडे, यवतमाळ जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी
बोलके आकडे…
पीककर्जासाठी पात्र शेतकरी :२,३१,४६५
कर्जवाटपाचे उद्दिष्ट : २,२०० कोटी
कर्जप्राप्त शेतकरी : १,३४,२६६
कर्जवाटपाची रक्कम : १,४५४ कोटी
राष्ट्रीयकृत बँका…
पात्र शेतकरी : १,१९,६५०
कर्जवाटपाचे उद्दिष्ट : १,२०३ कोटी
कर्जप्राप्त शेतकरी : ५३,९५८
कर्जवाटपाची रक्कम : ६६९ कोटी
टक्केवारी : ५५.६०%
खासगी बँका
पात्र शेतकरी : ८,८१५
कर्जवाटपाचे उद्दिष्ट : १३५ कोटी
कर्जप्राप्त शेतकरी : २,८१३
कर्जवाटपाची रक्कम : ६२ कोटी
टक्केवारी : ४६.१६%
विदर्भ कोंकण ग्रामीण बँक
पात्र शेतकरी : १८,०००
कर्जवाटपाचे उद्दिष्ट : १६१ कोटी
कर्जप्राप्त शेतकरी : १२,२३६
कर्जवाटपाची रक्कम : १६६.८२ कोटी
टक्केवारी : १०३%
यवतमाळ जिल्हा बँक
पात्र शेतकरी : ८५,०००
कर्जवाटपाचे उद्दिष्ट : ६९८ कोटी
कर्जप्राप्त शेतकरी : ६४, २२२
कर्जवाटपाची रक्कम : ५५५ कोटी
टक्केवारी : ७९%