सचिन वाझेच्या आड देवेंद्र फडणवीसांची नवीन चाल, गंभीर आरोपावर अनिल देशमुखांचे प्रत्युत्तर

नागपूर : माजी गृहमंत्रीअनिल देशमुखांनी देवेंद्र फडणवीसांवर खळबळजनक आरोप केले होते. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना विरोधी पक्षनेते असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी माझ्यावर दबाव टाकला. आणि उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अनिल परब आणि अजित पवार यांच्यावर आरोप करणारे प्रतिज्ञापत्र लिहून देण्यासाठी समित कदमला आपल्याकडे पाठवले होते, असे अनिल देशमुख म्हणाले होते. यावरुन राजकीय वातावरण तापले आणि आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सुरु झाले. यातच आता सचिन वाझेने देशमुखांवर खळबळजनक पुन्हा आरोप केल्याने खंडणी प्रकऱणात पुन्हा वादाची ठिणगी पडली आहे. यावर अनिल देशमुखांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

अनिल देशमुख म्हणतात…

‘देवेंद्र फडणवीस यांच्यावर मी चार-पाच दिवसांपूर्वी जे आरोप केले होते. जी वस्तुस्थिती जनतेसमोर आणली होती की, तीन वर्षांपू्र्वी कशा पद्धतीने उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना तुरुंगात टाकण्यासाठी कशा प्रकारे एफिडेविट करून द्यावं, यासाठी माझ्यासमोर प्रस्ताव आणला होता. यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांची ही नवीन चाल आहे. सचिन वाझेला हाताशी धरुन आरोप केला जात आहे.’

मुंबई हायकोर्टानेच म्हटलं आहे की सचिन वाझे गु्न्हेगारी प्रवृत्तीचा व्यक्ती आहे. त्याला दोन खुनाच्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली. एका गुन्ह्यामध्ये तो तुरुंगात आहे. याच्या कोणत्याही वक्तव्यावर विश्वास ठेवू शकत नाही, असे हायकोर्टानेही म्हटले आहे. अशा गु्न्हेगारी प्रवृत्तीचा माणसाला हाताशी धरुन फडणवीस माझ्यावर आरोप करत आहेत. जनतेला सांगू इच्छितो हे आरोप खोटे आहेत.’
BJP on Sachin Vaze: अनिल देशमुखांच्या खंडणी प्रकरणात वादाची ठिणगी, सचिन वाझेच्या गंभीर आरोपांनंतर भाजपचे मविआवर टीकास्त्र

सचिन वाझेचे आरोप काय?

‘देशमुख गृहमंत्री असताना त्यांच्या पीएच्या माध्यमातून पैसे घेत होते. याबद्दलचे पुरावे सीबीआयकडे आहेत. मी या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पत्र लिहिलेलं आहे आणि मी नार्को टेस्टसाठी कधीही तयार आहे.’ असा आरोप माजी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केला आहे.

देशमुखांवर भाजपचे टीकास्त्र

सचिन वाझेने आरोप करताच भाजपा नेत्यांनी अनिल देशमुखांवर टीकेची झोड उठवली. वाझेने केलेले आरोप हे गंभीर असून या खंडणी प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी भाजपा नेत्यांनी केली आहे. सचिन वाझेला तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा आशिर्वाद होता, अशी टीका प्रसाद लाड यांनी केली. तर ‘ज्याप्रमाणे देवेंद्र फडणवीसांवर आरोप करत अनिल देशमुख पेन ड्राइव्ह नाचवत होते, आता सचिन वाझेंनी जे सत्य सांगितलंय त्याहीबद्दल आम्हाला एक पेन ड्राइव्ह आम्हाला दाखवावा,’ असे नितेश राणेंनीही डिवचले. या सर्व प्रकरणी आता अनिल देशमुखांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Source link

allegations over 100 crore caseanil deshmukhDevendra Fadnavisncp sharad pawarsachin vazeअनिल देशमुखांचा पलटवारदेवेंद्र फडणवीसराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसचिन वाझे१०० कोटींचं खंडणी प्रकरण
Comments (0)
Add Comment