कुत्ते भौकते है, शेर खुलेआम ठोकते है, माझा नेता ठाकरे, नादी लागू नका, संजय राऊतांची डरकाळी

अभिजित दराडे, पुणे : माझ्यासमोर बॉस बसले आहेत आणि बोल म्हणता… वाघासमोर शेळीला बांधून ठेवायचं आणि म्हणायचं डरकाळी फोड, अशा शब्दात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी भाषणाला सुरुवात केली. विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून ठाकरे गटाच्या वतीने पुण्यात शिवसंकल्प अभियानाअंतर्गत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी अंबादास दानवे, विनायक राऊत, भास्कर जाधव, सुषमा अंधारे यांनी भाषणं केली. संजय राऊतांच्या भाषणावेळी उद्धव ठाकरे हसले असता, त्यांच्या हसण्याचं वर्णन मी एका ओळीत करेन, “ये हसता हुआ चेहरा लोगोंके जलने का कारण है” असं म्हणत राऊतांनी ठाकरेंसमोर षटकार ठोकला.

पुणे जिल्ह्यातील प्रत्येक जागा लढण्याची ताकद शिवसेनेची आहे. या प्रत्येक जागेवर शिवसेनेचा आमदार निवडून आलेला आहे. शिवसेनेने आत्तापर्यत खूप लोकांच्या पालख्या वाहिल्या आता स्वतःसाठी लढायचं, असं संजय राऊत म्हणाले.

कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात शिवसैनिकांनी जीवाची बाजी लावली, बारामतीत तुफान कष्ट केले पण आता शिवसैनिकांनी स्वतःकडे पहिले पाहिजे. आता पहिली पसंती शिवसेना आणि उद्धव ठाकरे, असं राऊत म्हणाले.

एक तर तू राहशील किंवा मी राहीन, हा संदेश घेऊनच पुढे जायचं. महाराष्ट्रात आता शिवसेनाच राहणार. तुम्हारे जैसे कुत्ते सिर्फ भोंकते है, शेर खुले आम ठोकते है, माझा नेता उद्धव ठाकरे आहे, माझ्या नादाला लागू नका, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.
Sanjay Raut : राज ठाकरे ‘वर्षा’वर, संजय राऊत म्हणतात, सर्व जागा लढण्याची घोषणा केलेली, आता मोठी डील होणार
लोकसभेत अपेक्षित यश आपल्याला मिळालं नाही. विधानसभेची लढाई त्यापेक्षा तुंबळ होणार आहे. आपण राहण्यासाठी छातीचा कोट करून लढावं लागेल. राज्यात अनेक ठिकाणी आपण गाफिल राहिलो, नाहीतर मोदी तर गेलेच होते, असंही पुढे संजय राऊत म्हणाले.

ADR संस्थेचा एक रिपोर्ट आलाय, तो रिपोर्ट असं सांगतो की ५३८ लोकसभा मतदारसंघात हेराफेरी झाली आहे. प्रत्यक्ष झालेलं मतदान आणि मोजलेली मतं यामध्ये तफावत आहे. महाराष्ट्रामध्ये चार मतदारसंघ असे आहे, जिथे आपण फार कमी मतांनी हरलो, याची आठवणही राऊतांनी यावेळी करुन दिली.
Raj Thackeray at Varsha : राज ठाकरे भरपावसात ‘वर्षा’वर, एकनाथ शिंदे स्वागतासाठी स्वतः दारात, कोणकोणत्या विषयांवर चर्चा?
विधानसभेत देखील असचं होण्याची शक्यता आहे, शिवसेनेला निवडणुका नवीन नाहीत, घाव झेलून इथपर्यंत आलोय, एक तर तू राहशील किंवा मी राहीन, हीच आपली टॅग लाईन आणि हाच आपला मंत्र. एकनाथ शिंदे यांच्या सारख्या चोर लफंग्याला शिवसेना अशीच चोरता येणार नाही. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या फॅन क्लबचे मेम्बर आहोत औरंगजेबचे नाहीत. औरंगजेबचा जन्म गुजरातचा आहे त्याची भाषा गुजराती होती, भाजपची वृत्ती औरंगजेबची आहे. म्हणूनच उद्धव साहेब म्हणतात हे औरंगजेबच्या औलादी, अशी टीकाही संजय राऊत यांनी केली.

Source link

Maharashtra politicsSanjay Raut Pune Speechshiv sena melavaUddhav ThackerayUddhav Thackeray Pune Shiv Sena Melavaउद्धव ठाकरे पुणे भाषणउद्धव ठाकरे शिवसेना पुणे मेळावाविधानसभा निवडणूकशिवसंकल्प मेळावाशिवसेना ठाकरे गट मेळावासंजय राऊत
Comments (0)
Add Comment