Kolhapur News: …अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार, सतेज पाटलांचा महामार्ग प्राधिकरणाला पंधरा दिवसाचा अल्टिमेटम

कोल्हापूर: पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर हजारो खड्डे पडल्यामुळे रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली आहे. कोल्हापूर ते पुणे या झालेल्या रस्त्याच्या अवस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी कोल्हापूरच्या किणी टोलनाक्यावर काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली सकाळी दहा वाजल्यापासून आंदोलन करण्यात आलं. या आंदोलन किनी टोलनाक्यावरून सर्व वाहने विना टोल देता सोडण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत संपूर्ण परिसर दणाणून सोडला.तर राज्य सरकारचा लक्ष वेधण्यासाठी काही काळ महामार्ग रोखो आंदोलन केलं. यामुळे दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठ्याच मोठ्या रांगा लागल्या होत्या. दरम्यान नॅशनल हायवे अथोरिटी ऑफ इंडियाच्या वतीने टोल वसुलीमध्ये २५ टक्क्यांची सूट जाहीर करत टोल नाक्यापासून २० किलोमीटर अंतरापर्यंत असणाऱ्या लोकांना टोल मधून सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच रस्त्यावरील खड्डे मोजण्यासाठी पंधरा दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. त्यानंतर हे आंदोलन स्थगित केल्याची घोषणा सतेज पाटील यांनी केली आहे.
Devendra Fadnavis : उद्धव ठाकरे औरंगजेब क्लबचे सदस्य, गृहमंत्री फडणवीसांचा पलटवारगेल्या कित्येक वर्षांपासून पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील सुरू असलेल विस्तारीकरणाचा काम रेंगाळलेलं असून संपूर्ण महामार्ग खड्डेमय झाला आहे. या मधून वाहनधारकांना मार्ग काढत जाण्यासाठी मोठी कसरत करावे लागत आहे .असे असताना देखील रस्ते प्राधिकरण च्या वतीने टोल वसुली मात्र जोरदारपणे सुरू आहे. या सर्व प्रश्नी आता काँग्रेस आक्रमक झाली असून पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग जाणाऱ्या पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर येथील टोल नाक्यांवर काँग्रेसच्या वतीने आज जोरदार आंदोलन करण्यात आलं.

यामध्ये खड्ड्यांनी भरलेल्या कोल्हापूर-पुणे महामार्गावर टोल का द्यायचा? असा प्रश्न उपस्थित करत कोल्हापूर जवळील किणी टोल नाक्यावर आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वात सकाळी दहा वाजता आंदोलनाला सुरुवात करण्यात आलं. यावेळी या आंदोलनात आमदार ऋतुराज पाटील, आमदार राजुबाबा आवळे, आमदार जयश्री जाधव, आमदार जयंत आसगावकर, राहुल (पी.एन.) पाटील यांच्यासह नेते आणि कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. यावेळी अनेक वाहतूक संघटनाने देखील या आंदोलनाला पाठिंबा दिला.
सकाळी दहाच्या सुमारास सुरू झालेल्या आंदोलन दरम्यान सुरुवातीला टोल वसुली बंद करत वाहतूक सुरू करण्यात आली. मात्र दुपारचे साडे बारा वाजले तरी शासन दरबारावरून कोणतेही निर्णय येत नसल्याने आक्रमक आलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी अखेर दोन्ही बाजूने महामार्ग रोखून धरला. यामुळे या मार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक खोळंबली. यामुळे वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. जोपर्यंत निर्णय होत नाही, तोपर्यंत आंदोलन स्थळावरून मागे हटणार नाही अशी भूमिका आंदोलकांनी घेतली. तर आमदार सतेज पाटील यांच्यासह सर्व आमदारांनी रस्त्यावरच खरडा भाकरी खात आंदोलन सुरू ठेवले.

यानंतर दुपारी दीडच्या सुमारास नॅशनल हायवे अथोरिटी ऑफ इंडियाच्या वतीने सतेज पाटील यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती करत केली. तसेच टोल वसुलीमध्ये २५ टक्क्यांची सूट जाहीर करत टोल नाक्यापासून २० किलोमीटर अंतरापर्यंत असणाऱ्या लोकांना टोलमधून सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे पत्र सतेज पाटलांना देण्यात आले. यानंतर सतेज पाटील यांनी रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी पंधरा दिवसांचा अल्टिमेटम हायवे अथोरिटीला दिले. त्यानंतर हे आंदोलन स्थगित केल्याची घोषणा केली. मात्र चार ते पाच तास चाललेल्या या आंदोलनादरम्यान प्रवाशांना मात्र फटका बसला.

Source link

Kolhapur newskolhapur potholessatej patil newssatej patil on highway authoritysatej patil ultimatumकोल्हापूर खड्डे प्रश्नकोल्हापूर बातमीसतेज पाटील आंदोलनसतेज पाटील आंदोलन बातमी
Comments (0)
Add Comment