नागपूर: जिल्ह्यात अपघातांचे प्रमाण वाढत आहे. अशी एक दुर्दैवी घटना नागपुरातून समोर आली आहे. परीक्षा देऊन घरी जात असताना मोपेडला ट्रकने धडक दिली आहे. यात दुचाकीवरी बहीण ठार तर भाऊ जखमी झाला आहे. ही घटना बेसा-मनीषनगर मार्गावरील हल्दीरामसमोर घडली. बहिणीची ही परीक्षा अंतिम ठरली. प्रियंका योगेश मानकर (२६ रा.पांजरा कोराडी) असे मृतकाचे तर योगेश आवारे ,असे जखमीचे नाव आहे. त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रियंकाची शनिवारी सकाळी बेस्यातील संचिती शाळेत बँकिंगची परीक्षा होती. यासाठी प्रियंका ही भाऊ योगेश याच्यासोबत एमएच-४०-एआर-७०७७ या क्रमांकाच्या मोपेडने आली. दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास परीक्षा संपली. दोघेही मोपेडने जात होते. बेसा चौकात योगेशने एमएच ४० सीआर ३४०३ या ट्रकला ओव्हरटेक केले. मोपेड स्लीप झाल्याने दोघेही खाली पडून ट्रकच्या मागील चाकात आले. या घटनेत दोघे गंभीर जखमी झाले होते. घटना घडताच तेथे नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यानंतर नागरिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच बेलतरोडी पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला.पोलिसांनी तात्काळ जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी तपासून प्रियंकाला मृत घोषित केले. यानंतर या घटनेची माहिती बहीण भावाच्या कुटुंबाला देण्यात आली. घटना समजताच कुटुंबियांनी त्वरित रुग्णालयात धाव घेतली. समोरील दृश्य पाहून कुटुंबाच्या पायाखालची जमीनच सरकली. पालकांनी रुग्णालयात हंबरडा फोडला. या घटनेचा कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांकडून या घटनेवर हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान अपघातानंतर चालक ट्रक सोडून पळायला लागला. नागरिकांनी पाठलाग करून त्याला पकडले. त्यानंतर नागरिकांनी त्याला चांगलाच चोप दिला. पोलिसांनी नागरिकांच्या तावडीतून त्याची सुटका केली. याप्रकरणी बेलतरोडी पोलिसांनी प्राणांतिक अपघाताचा गुन्हा दाखल करून ट्रक चालकाला अटक केली आहे. दरम्यान, योगशने हेल्मेट घातले असल्याने त्याच्या डोक्याला अधिक मार लागला नाही.