Parbhani News: सासू-सासऱ्यांचा खंबीर पाठिंबा, सुनेची पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी, जिद्दीच्या जोरावर गाठलं यशोशिखर

धनाजी चव्हाण, परभणी: पुर्णा तालुक्यातील सिरकळस येथील शेतकरी कुटुंबातील अलका रेशमाजी भोसले यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेद्वारे पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली आहे. जिद्द आणि कठोर मेहनतीच्या बळावर त्यांनी हे यशोशिखर गाठले असून याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. अलका भोसले ह्या विवाहित असून त्यांचे सासर परभणी तालुक्यातील रायपूर आहे. त्यांचे पती सुदन मस्के हे शेती करतात.

गावात शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अलका भोसले यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर परभणी येथील श्री शिवाजी महाविद्यालयातून एम. ए.(अर्थशास्त्र) ही पदव्युत्तर पदवी संपादन केली. विशेष बाब म्हणजे त्यांनी लग्नानंतर आपले पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले असून यासाठी पतीसह सासू – सासऱ्यांनी त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे २०२२ मध्ये पोलीस उपनिरीक्षक पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या परीक्षेची तयारी अलका भोसले यांनी सुरू केली. ८ ऑक्टोबर २०२२ रोजी घेण्यात आलेली पूर्व परीक्षा त्या उत्तीर्ण झाल्या. दुसऱ्याच प्रयत्नात यश मिळाल्याने त्यांचा आत्मविश्वास दुणावला.
Ratnagiri News : आई-वडील शेतकरी, लेकाची पहिल्याच प्रयत्नात भरारी; मेहनत-जिद्दीने पोलीस उपनिरीक्षकपदी निवड
अधिक वेळ अभ्यासासाठी देत २९ ऑक्टोबर २०२३ रोजी मुख्य परीक्षा दिली. या परीक्षेतही उत्तीर्ण होत घवघवीत यश संपादन केले. त्यानंतर मैदानी चाचणी ३ जून २०२४ रोजी तर मुलाखत २ जुलै २०२४ रोजी घेण्यात झाली. या परीक्षेद्वारे अलका भोसले यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली आहे. अलका यांचे पती सुदन मस्के हे रायपूर येथील रहिवासी असून शेती व्यवसाय करतात. अलका भोसले यांनी संपादन केलेल्या यशाबद्दल सुरेश शिंदे, मुकुंदराव मस्के, फौजदार मदन मस्के, रघुनाथ खटींग, एकनाथ मस्के आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे. अलका भोसले यांचा रायपूर येथे सत्कार करण्यात आला. यावेळी सासरे मुकुंदराव मस्के, सासु रेखा मस्के, पती सुदन मस्के, मामा सुरेश शिंदे, सविता शिंदे, सुनिल शिंदे यांनी त्यांचा सत्कार केला.

Source link

alka bhosle as sub inspectoralka bhosle mpsc newsmaharashtra public service commission examparbhani newsअलका भोसले बातमीपोलीस उपनिरीक्षक अलका भोसलेमहाराष्ट्र लोकसेवा आयोग
Comments (0)
Add Comment