BJP च्या माजी आमदार तुतारी फुंकणार, कट्टर समर्थकाचा पंकजा मुंडेंना धक्का, राजकीय उलथापालथ होण्याचे संकेत

पाचेंद्रकुमार टेंभरे, बीड: पंकजा मुंडे समर्थक माजी भाजप आमदार संगिता ठोंबरे यांनी आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेत भाजपला धक्का देण्याची तयारी केली आहे. त्या लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) गटात पक्षप्रवेश करतील. काही दिवसांपूर्वी केज विधानसभा मतदारसंघात त्यांनी दौरा करून या मतदारसंघावर २०२४ विधानसभा निवडणुकीवर आपला दावा असल्याचं जाहीर केलं होतं. मात्र आज संगीता ठोंबरे आपल्या पतीसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबईतील कार्यालयात दाखल झाल्या.
Solapur News : जिल्हा नियोजन बैठकीत गोंधळ; सत्तेतील सदस्य आणि आमदारांमध्ये हमरीतुमरी, अप्पर तहसील कार्यालयाचा मुद्दा ऐरणीवर
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. कट्टर पंकजा मुंडे समर्थक असलेल्या संगिता ठोंबरे यांनी एक प्रकारे बीड जिल्ह्यात राजकीय उलथापालथ होण्याचे संकेत दिले आहेत. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. संगिता ठोंबरे यांनी २०१२च्या विधानसभा पोटनिवडणुकीतून राजकारणात प्रवेश केला होता. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी त्यांना या पोटनिवडणुकीत उमेदवारी दिली होती. पोट निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. २०१४ च्या निवडणुकीत भाजपच्या आमदार झाल्या. मात्र २०१९च्या निवडणुकीवेळी संगिता ठोंबरे यांना भाजपने उमेदवारी नाकारून त्या ठिकाणी नमिता मुंदडा यांना उमेदवारी दिली आणि त्या आमदार झाल्या.

त्यानंतर संगिता ठोंबरे या राजकीय अज्ञातवासात होत्या. काही राजकीय कार्यक्रमांना त्यांची हजेरी दिसायची. २०१९ विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर संगिता ठोंबरे या पक्षात अस्वस्थ होत्या. पुढे आपल्याला उमेदवारी मिळेल की नाही याची शाश्वती त्यांना मिळत नव्हती. परिणामी आज त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुंबई येथील पक्ष कार्यालय गाठलं. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांसोबत मन की बात केली. आता प्रतिक्षा आहे ती फक्त पक्षप्रवेशाची! बीड जिल्ह्याच्या केज विधानसभा मतदारसंघात आगामी विधानसभा निवडणुकीत संगीता ठोंबरे विरुद्ध नमिता मुंदडा हा राजकीय सामना नक्कीच उलथापालथ घडवणारा असेल. सध्या त्यांच्या पक्ष प्रवेशाच्या चर्चांमुळे राजकारणात चर्चांना उधाण आले आहे.

Source link

beed newsbeed politicssangita thombre joins ncpsangita thombre newsबीड राजकारण बातमीमहाराष्ट्र राजकारण बातमीसंगिता ठोंबरे पक्षप्रवेशसंगिता ठोंबरे बातमी
Comments (0)
Add Comment