पुणेकरांनो, मुलांना सांभाळा! लहान मुलांमध्ये वाढतोय डेंगी, टायफॉइडचा संसर्ग; जाणून घ्या बालरोगतज्ज्ञाचं मत

म. टा. प्रतिनिधी, पुणे : शहरात डेंगी, चिकनगुनिया, टायफॉइड या आजारांचा संसर्ग वाढला असून, याचा सर्वाधिक सामना लहान मुलांना करावा लागत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मुलांमध्ये डेंगीची तीव्रता वाढली आहे. संसर्ग झाल्यानंतर पाच ते सात दिवसांनी दिसून येणारी गंभीर लक्षणे यंदा तीन ते चार दिवसांतच दिसून येत असल्याचे निरीक्षण बालरोगतज्ज्ञांनी नोंदविले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण जास्त असल्याने आगामी काळात डेंगीच्या रुग्णांमध्ये वाढ होण्याची शक्यताही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

डेंगीची तीव्र स्वरूपाची लक्षणे असल्यास प्रकृती गंभीर होण्याची शक्यता असते. डेंगीमुळे रक्तदाब वाढणे, हृदयाचे ठोके कमी होऊन त्यातून यकृत, हृदय आणि मेंदूच्या अवयवांना धोका निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे वेळेत उपचार घेण्याचा सल्ला बालरोगतज्ज्ञांनी दिला. दोन वर्षांखालील आणि दहा वर्षांवरील मुलांमध्ये डेंगी होण्याचे प्रमाण जास्त दिसून येत आहे.

साधारणत: जुलैपासून डेंगीचे रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण वाढले आहे. आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलच्या ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रिया मानकरे म्हणाल्या, ‘सध्या मुलांमध्ये डेंगीसह टायफॉइड, कावीळ, चिकुनगुनिया या प्रकारचे आजार वाढले आहेत. सुरुवातीलाच डेंगीची तीव्र लक्षणे दिसून येत असल्याने दाखल होण्याचे प्रमाण वाढले आहे. डेंगीचा संसर्ग झाल्यानंतर काही मुलांना तीव्र पोटदुखीचा त्रास होतो. त्यामुळे पोटाचा आजार झाला, असे वाटते; परंतु ही लक्षणे डेंगीची असतात. यामुळे तीव्र पोटदुखी, डोकेदुखी, उलट्या अशी लक्षणे असल्यास डॉक्टरांचा सल्ला त्वरित घ्यावा.

यंदा डेंगीची तीव्रता वाढली असून, लहान मुलांमध्ये वेगवेगळ्या स्वरूपाची लक्षणे दिसून येत आहेत. डेंगी झाल्यानंतर पूर्वी पाच ते सात दिवसांनी तीव्र ताप येणे, पोटदुखी, प्लेटलेट्स कमी होणे, प्रकृती गंभीर होणे या प्रकारची लक्षणे दिसून येत होती. मात्र, यंदा संसर्ग झाल्यानंतर दोन ते तीन दिवसांत या प्रकराची लक्षणे दिसून येत आहेत.– डॉ. सुमंत पाटील, बालरोग अतिदक्षता विभागप्रमुख, दीनानाथ मंगेशकर रुग्णालय
सावधान… राज्यात डेंगी, चिकुनगुनियाने काढले डोके वर; चिंताजनक आकडेवारी समोर
लक्षणे

– उलट्या होणे
– लघवी कमी होणे
– अंगाला सूज येणे
– प्लेटलेट्स कमी होणे
– तीव्र डोकेदुखी
– पुरळ येणे

महापालिका आरोग्य विभागाची आकडेवारी
महिना संशयित रुग्ण पॉझिटिव्ह रुग्ण

– मे : ४४ : ०
– जून : १५७ : ०
– जुलै : ६३६ : ३४
– ऑगस्ट : २९ : ०

Source link

child dengue casespune dengue casesPune Dengue Typhoid Casespune health problemsआदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलपुणे बातम्याबालरोगतज्ज्ञ
Comments (0)
Add Comment