Dhule News: घराबाहेर खेळताना अनर्थ, सर्पदंशाने दोन चिमुकल्यांचा अंत; कुटुंबियांचा आक्रोश

अजय गर्दे, धुळे : धुळे तालुक्यातील लळींग आणि चौगाव गावात सर्पदंशामुळे दोन बालकांनी आपला प्राण गमावल्याची घटना घडली. त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. यात एका बालकासह बालिकेचा समावेश असून या प्रकरणी दोन वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.लळींग गावात ३१ रोजी दुर्गा सोमा पवार (वय ७ रा. लळींग ता. धुळे) ही बालिका तिच्या मैत्रिणीच्या राहत्या घराच्या पाठीमागे खेळत असताना सर्पाने दुर्गाच्या उजव्या पायाला दंश केला असता उपचारार्थ हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. उपचाराअंती दुर्गा हिचा मृत्यू झाला. डॉ. अर्जुन यांनी तपासणी अंती मृत घोषित केले. या प्रकरणी मोहाडी उपनगर पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस सोनवणे करत आहेत.
Imane Khelif: पुरुष की स्त्री या वादात अडकलेल्या अल्जेरियन बॉक्सरची कमाल; इमान खलिफ ऑलिम्पिकमध्ये जिंकणार पदक

धुळे तालुक्यातील चौगाव गोतणे येथे ९ वर्षीय बालक इमानविल जगदिश सोनवणे (वय ९ रा. चौगाव ता. धुळे) २९ रोजी परिवारासह राहत्या घरात जमिनीवर झोपला असता अचानक सापाने त्याच्या उजव्या पायाला दंश केला. तो रडू लागला यावेळी साप चावल्याचे निदर्शनास आल्याने त्यास उपचारार्थ येथील हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू असताना मृत्यू झाला. यावेळी डॉक्टरांनी तपासणीअंती मृत घोषित केले. या प्रकरणी धुळे तालुका पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, या दोन्ही घटनांमध्ये बालकांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात आले.

पोलिसांच्या सतर्कतेने चिमुकल्याला पुनर्जन्म

शिरपूर पोलिसांच्या सतर्कतेमुळे एका ९ महिन्यांच्या बाळाला पुनर्जन्म मिळाला आहे. मद्यपी महिला या बाळाला घेऊन शहरात भटकत होती. या बाबतची माहिती पीएसआय छाया पाटील यांना मिळाली होती. त्यानंतर त्यांनी आणि त्यांच्या टीमने सदर महिलेला ताब्यात घेत तिच्या तावडीतून चिमुरड्याची सुटका केली आहे.

शिरपूर शहरातील वरवाडे शिवारात ५० वर्षीय महिला ८ ते ९ महिन्यांच्या बाळाला घेवून फिरत होती. ती मद्यधूंद अवस्थेत असल्याने तिच्यावर संशय बळावला होता. त्यामुळे शिरपूर शहर पोलीस त्या ठिकाणी दाखल झाले. तोपर्यंत नागरिकांचीही मोठी गर्दी झाली होती.

Source link

children die of snake bitedhule newsdhule policeधुळे पोलीसधुळे बातम्यासाप चावल्याने मुलांचा मृत्यू
Comments (0)
Add Comment