कार्ला एकविरा गडाच्या पायऱ्यांवर धबधब्याचं पाणी, अनेक भाविक अडकले, पावसाचा जोर वाढला

प्रशांत श्रीमंदिलकर, मावळ (पुणे) : मावळ तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. मावळातील पवना धरण हे शंभर टक्के भरण्याच्या मार्गावर आहे. तर दुसरीकडे अनेक ठिकाणी पाणी साचल्याचं देखील पाहायला मिळत आहे. पुण्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. खडकवासलातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने अनेक भागात पाणी साचलं आहे. त्यातच मुंबई आणि पुणेकरांचं श्रद्धास्थान असलेल्या एकविरा देवीच्या कार्ला गडाच्या पायऱ्यांवरून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहू लागले आहे. त्यामुळे देवीच्या दर्शनासाठी आलेले अनेक भाविक, पर्यटक कार्ला गडावर अडकून पडले आहेत.

कार्ला गडावर राज्यभरातून अनेक पर्यटक, भाविक एकविरा देवीच्या दर्शनासाठी तसंच पर्यटनासाठीही येत असतात. मुंबईतील अनेक नागरिकांचं कार्ला देवी हे श्रद्धास्थान आहे. देवीच्या दर्शनासाठी शनिवार आणि रविवार या दोन दिवशी तुफान गर्दी पाहायला मिळते. आज सकाळी या भागामध्ये पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे देवीच्या डोंगरामधून पाण्याचा मोठा प्रवाह वाहू लागला आहे. तो प्रवाह पायऱ्यांवरुन मोठ्या प्रमाणावर वाहत आहे. त्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या नागरिकांना पायऱ्यांच्या मार्गातच, रस्त्यातच अडकून बसावं लागलं आहे.
Temple Wall Collapsed : धार्मिक कार्यक्रमावेळी मंदिराची भिंत कोसळली, दुर्घटनेत ९ लहान मुलांचा मृत्यू तर ४ जखमी
कार्ला गडावरून आत्तापर्यंत एका महिन्यात दोन वेळा पाणी गडाच्या पाऱ्यांवरून मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे. त्यामुळे इथे येणाऱ्या भाविकांना इथेच अडकून बसावं लागत आहे. सकाळपासूनच डोंगर भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस असल्याने या भागातील पाण्याचा प्रवाह उताराच्या दिशेने वाहत आहे. कार्ला गडावरील देवीच्या प्रवाहात गडाला देखील धबधब्याचं स्वरूप आलं आहे. गडावरून पाणी थेट पायऱ्यांच्या दिशेने वाहत आहे.

कार्ला गडावर सकाळपासूनच भाविकांची गर्दी होती. त्यात पावसाचा जोर वाढल्याने पायऱ्यांवरुन पाणी वाहू लागलं. त्यामुळे अनेक भाविक या ठिकाणी अडकले आहेत. तसंच स्थानिक दुकानदारांना देखील या जोरात असलेल्या वाहत्या पाण्याचा त्रास सहन करावा लागत आहे. कार्ला गडावर येताना भाविकांनी सतर्कता बाळगावी आणि सुरक्षितपणे गडावर यावं, असं आवाहन कार्ला गड प्रशासनाकडून सर्व पर्यटकांना करण्यात आलं आहे.

Source link

ekvira devi karla rainekvira devi templelonavala karla ekvira rainPunepune lonavala rainPune newsएकविरा देवीच्या गडावर पावसाचं पाणीकार्ला एकविरा देवी पाऊसकार्ला गडावर पावसाचं पाणीपुणे मावळ पाऊस
Comments (0)
Add Comment