आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने तयारी करण्यासाठी जिल्हा भाजपातर्फे आज चंद्रपुरातील एड.दादाजी देशकर सभागृहात महाअधिवेशन पार पडले. महाअधिवेशनात ग्रामीण आणि महानगरातील कार्यकर्ते आले होते. कार्यकर्त्यांची संवाद साधताना मुनगंटीवार यांनी लोकसभा निवडणुकीत दगा फटका करणाऱ्यांच्या आपल्या शैलीत समाचार घेतला आहे.
काय म्हणाले मुनगंटीवार…
लोकसभेत कुणी विरोधात काम केलं, याची यादी मला एका कार्यकर्त्याने आणून दिली आहे. ती यादी आपल्या विरोधी उमेदवाराच्या कार्यालयातून गुप्तपणे त्याने आणली होती,यादी बघून मी संतापलो नाही, हाताला जखम झाली तर हात तोडायचा नसतो. दिशा चुकली म्हणून दशा करायची नसते, अश्या लोकांची मी स्वतंत्र बैठक घेईन, त्यांना इंजेक्शन नक्की देईन, जेव्हा माझ्या लक्षात येईल की औषध लागत नाही,तेव्हा मात्र ऑपरेशन करणं गरजेचं राहील.
घर का भेदी कोण?
लोकसभेच्या निवडणुकीनंतर भाजपामधील अंतर्गत कलह अधिक तीव्रतेने पुढे येत असल्याचे बोलले जात आहे. गद्दारांची यादी आपल्याकडे आहे या मुनगंटीवारांचा वक्तव्याने दगा फटका करणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या तोंडावरचे पाणी नक्की पळाले असेल. दुसरीकडे काँग्रेसमध्ये वादळ उठण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
राहुल गांधी देशाचे तुकडे करणार
याच देशावर मोठ संकट आलं आहे. हेच संकट आहे दृष्ट विचाराच्या शक्तीचे, लोकसभेत राहुल गांधी यांनी केलेल्या भाषणाकडे केवळ भाषण म्हणून बघू नका. ही तर देश्याचे तुकडे तुकडे करण्याची सुरुवात आहे. गांधींचा विचार आहे, जाती जातीत द्वेष लावणे .जाती जातीत द्वेष लावताना मला भीती आहे.लाकडाला लागलेले किडे पूर्ण खुर्ची खाऊन टाकतात.पण ज्या नेत्यांचा डोक्यात किडे लागतात ते नेते पूर्ण देश खाऊन टाकतात.काही डोक्याना किडे लागले आहेत. ते संसदेत भाषण देत आहेत.जाती जातीत विष घेऊन फिरत आहेत.कानात विषारी विचार गेलेल्या नेत्याला भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रवादाचे देशभक्तीच वॅक्सिन अशा लोकांपर्यंत पोहोचावं लागेलं,अशी विखारी टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली. आज चंद्रपुरात भाजपचे महाअधिवेशन पार पडले. त्यात मुनगंटीवार बोलत होते.