पुणे (जुन्नर): दिवसेंदिवस अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यातच नगर कल्याण महामार्गावर जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव जोगा येथे लक्झरी बस आणि कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे. आळेफाटावरून कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या बसची समोरून येणाऱ्या चारचाकी गाडीला जोरात धडक बसली. या अपघातात दोन महिलांचा जागेवर मृत्यू झाला आहे. तर आणखी दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भाग्यश्री साहेबराव गायकर (१८ रा. कळंब ता. अकोले जि. अहमदनगर) कुसुम मारूती शिंगोटे (५५ रा. बदगी बेलापुर ता. अकोले जि. अहमदनगर) या दोन महिलांचा जागेवर मृत्यू झाला आहे. तर सविता साहेबराव गायकर (३८ रा. कळंब ता. अकोले जि. अहमदनगर) सुनिता कारभारी हाडवळे (५७ रा. लिंगदेव ता. अकोले जि. अहमदनगर) या दोन महिलांचा उपचारदरम्यान मृत्यू झाला आहे. तर या घटनेत साहील साहेबराव गायकर (२२ रा. कळंब ता. अकोले जि. अहमदनगर) साहेबराव रामदास गायकर (४२ रा. कळंब ता. अकोले जि. अहमदनगर) अशी जखमीची नावे आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आज सकाळच्या सुमारास हा अपघात झाला होता.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण नगर महामार्गावर पिंपळगाव जोगा गावाजवळ आळेफाटाकडून कल्याणच्या दिशेने जाणारी लक्झरी बस आणि कल्याणच्या दिशेकडून आळेफाटाकडे येणारे चारचाकीची समोरासमोर जोरात धडक झाली. या अपघातात दोन महिलांचा जागेवरच मृत्यू झाला. ही धडक इतकी भीषण होती की कारचा अक्षरश: चुराडा झाला आहे. यात आणखी दोन महिलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातामध्ये दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले असून पोलिसांकडून दोन्ही गाड्या रस्त्यावरून हटवण्यात आले आहेत. हा अपघात होताच नागरिकांनी गर्दी केली होती. ओतूर पोलीस स्टेशनचे पोलीस या अपघाताचा तपास करत आहेत.