लोकसभेला भावाविरोधात प्रचार, आता विधानसभेला तुतारी फुंकण्याच्या तयारीत, भावा-बहिणीत लढाई नक्की?

अर्जुन राठोड, नांदेड : विधानसभा निवडणूकीपूर्वी नांदेडमध्ये पक्ष बदलाचे वारे वाहू लागले आहेत. काही दिवसांपूर्वी दोन बड्या नेत्यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला होता. काही बडे नेते पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जाणार असल्याची चर्चा आहे. त्यातच शेकापच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा आशा शिंदे यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याने नांदेड जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. आशा शिंदे या लवकरचं तुतारी फुंकणार असल्याची देखील चर्चा आहे. त्यामुळे लोहा कंधार आगामी विधानसभेची निवडणूक माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर आणि आशा शिंदे या भाऊ-बहिणीमध्ये होणार हे जवळपास निश्चित झालं आहे.
Ajit Pawar : लोकसभेच्या निकालाने मी नाराज नाही, पराभवाला मी स्वत: जबाबदार; रोखठोक दादांकडून विषय एन्ड

शरद पवारांच्या भेटीनंतर चर्चेला उधाण

आशाताई शिंदे या शेकापचे आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या पत्नी आहेत. लोहा कंधार मतदार संघातून त्या विधानसभेची निवडणूक लढणार आहेत. निवडणुकीची तयारी देखील सुरु केली असून मतदार संघात गाठीभेटी देखील त्या घेत आहेत. आशा शिंदे या भाजपचे माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या भगिनी आहेत. लोकसभेपूर्वी काँग्रेसमध्ये त्यांचा प्रवेश निश्चित होता, मात्र प्रवेश झाला नाही. लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाऊ प्रताप पाटील चिखलीकर यांच्या विरोधात प्रचार केला.
Temple Wall Collapsed : धार्मिक कार्यक्रमावेळी मंदिराची भिंत कोसळली, दुर्घटनेत ९ लहान मुलांचा मृत्यू तर ४ जखमी
दरम्यान, विधानसभा निवडणुकीला दोन महिने शिल्लक राहिले असताना त्यांनी मुंबईत शरद पवारांची भेट घेतल्याने चर्चेला उधाण आलं आहे. आशा शिंदे या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. दुसरीकडे या भेटीने शिवसेना उबाठा गटातील पदाधिकाऱ्यांची चिंता वाढली आहे. लोहा कंधार मतदार संघातून शिवसेना उबाठा गट उमेदवार उभा करणार असल्याची माहिती आहे. शिवसेनेचे लोकसभा संघटक एकनाथ पवार यांच्या नावाची देखील चर्चा आहे. त्यातच आशाताई या राष्ट्रवादीत जाणार असल्याने शिवसेना उबाटा गटातील पदाधिकाऱ्यांमध्ये धाकधूक वाढली आहे.

बहीण – भावामध्ये होणार लढत

लोहा कंधार मतदार संघाकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. या मतदार संघातून भाजपचे माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर निवडणूक लढणार आहेत. शिवाय त्यांच्या भगिनी आशाताई शिंदे यांनी देखील निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक बहीण भावामध्ये रंगणार आहे. आपापल्या वाढदिवसाच्या दिवशी दोघांनी कार्यक्रमाच्या माध्यमातून मतदार संघात मोठं शक्ती प्रदर्शन केलं होतं.

Source link

asha shindenanded newsncp sharad pawarSharad Pawarनांदेड विधानसभा लोहा कंधार मतदार संघभाजप माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकरशरद पवारशेकाप आशाताई शिंदे
Comments (0)
Add Comment