Worli Vidhan Sabha : आदित्य ठाकरेंच्या विरोधात मनसे उमेदवार देणार, शिंदे – ठाकरेंच्या भेटीत काय ठरले?

मुंबई : विधानसभेसाठी राज्यात सर्वपक्षीय नेत्यांनी तयारी सुरु केली आहे. अशातच राज ठाकरे यांनी ‘एकला चलो रे चा’ नारा देत राज्यात स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. लोकसभेत महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंनी विधानसभेच्या तोंडावर मात्र स्वबळावर लढण्याचे ठरवले आहे. त्याच दृष्टीने राज ठाकरे ऑगस्ट महिन्यातून राज्याचा दौऱ्यावर निघणार आहेत. अशातच पुतण्या आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ असलेला वरळी इथून राज ठाकरे मनसेचा उमेदवार देणार असल्याची चर्चा समोर येत आहे.
‘बिनशर्त पाठिंब्यानंतर’ राज ठाकरेंच्या मनसेची ‘नवनिर्माणाची लाट’, महाराष्ट्र दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर

काल शनिवारी राज ठाकरे यांनी सीएम एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. वरळी समस्येचा मुद्द्यावर राज ठाकरे यांनी शिंदेंसोबत चर्चा केली असे सूत्रांची माहिती मिळते. वरळीतील अनेक समस्यावर राज ठाकरे यांनी शिंदेंसोबत चर्चा केल्याचे समजते. बैठकीनंतर शिंदेंनी वरळीतील प्रश्न मार्गी लावण्याचे निर्देश दिल्याचे सीएम कार्यालयाकडून समजते. २०१९ साली ठाकरे कुटुंबाचे पहिले सदस्य म्हणून आदित्य ठाकरे यांनी वरळी विधानसभेतून थेट निवडणुक लढवली. याआधी बाळासाहेब ठाकरे यांच्या कुटुंबातील कोणीही निवडणुक लढवली नव्हती. आदित्य ठाकरे यांनी वरळी मतदारसंघातून लढणार, असे जाहीर करताच राज ठाकरेंनी सुद्धा वरळीतून उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला होता.

२०१९ मध्ये ६२ हजार २४७ मतांनी वरळीची जागा जिंकली. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत ठाकरेंच्या सेनेच्या व्होट शेअर मध्ये मोठी घसरण झाल्याचे चित्र दिसते. अशातच सत्ताधारी पक्ष आणि मनसे याच संधींचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे माहिती मिळते. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी २०१७ साली वरळीतून ३० हजार ते ३३ हजार व्होट घेतले होते, याचाच फायदा घेत मनसे आगामी विधानसभा निवडणुकीत वरळीतून संदीप देशपांडे यांना उतरवण्याची तयारी करत असल्याची चर्चा समोर येत आहे. अशातच मनसेने जर उमेदवार वरळी मतदारसंघातून दिला तर आदित्य ठाकरे यांच्या मतावर काही प्रमाणात फरक पडू शकतो अशी शक्यता राजकीय तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.

Source link

aditya thackeray on vidhan sabhasandeep deshpandeVidhan Sabha Electionworli vidhan sabha seatआदित्य ठाकरेराज ठाकरेवरळी विधानसभा मतदारसंघसंदीप देशपांडे
Comments (0)
Add Comment