पुणे (बारामती) : तब्बल एका महिन्यानंतर अजित पवार बारामतीत आज वेगवेगळ्या उपक्रमाच्या निमित्ताने आले. जनसन्मान मेळाव्यापासून अजित पवार बारामतीत आलेच नव्हते. आज सकाळीच अजित पवारांच्या हस्ते बारामतीतील नागरिकांना ६५ हजार वृक्ष वाटप करण्यात आले. त्याचा कार्यक्रम बारामतीच्या शारदा प्रांगणात झाला. यावेळी अजित पवारांचे भाषण देखील झाले. यावेळीच भाषण अजित पवारांनी त्यांच्या स्टाईलने केले आणि त्यांच्या तोंडी असे अनेक शब्द आले. त्यातून उपस्थितांमध्ये हशा पिकला. हा ६५ हजार वृक्ष वाटप उपक्रम राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.अजित पवार म्हणाले, ज्यांच्या घरासमोर जागा आहे. त्यांनी अवश्य झाडे लावावीत. ही झाडे आरोग्यासाठी व आयुष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. याचा विचार करून ही झाडे लावावीत. ही झाडे उत्तमरीत्या वाढवावी यासाठी आपण एक स्पर्धा राबवूया.जे नागरिक पाच झाडे उत्तमरीत्या सांभाळतील त्याचे संवर्धन करतील व वाढवतील त्यांना पाच हजार रुपये त्याच बरोबर तीन हजार रुपये व एक हजार रुपये अशा क्रमाने बक्षीस हे आपण देऊ. या बक्षिसांचे वितरण पर्यावरणावर प्रेम करणाऱ्या पर्यावरण प्रेमी लोकांकडून केले जाईल. यामध्ये आम्ही कोणीही हस्तक्षेप करणार नाही.
तेवढ्यात अजित पवार थांबले आणि पुन्हा म्हणाले, मात्र कोणीतरी ही झाडे मेली, कोणी मारली अशा स्वरूपाचा सांगून काही वेगळाच प्रकार करू नका.. किंवा जुनी झाडे दाखवून समितीला चुकीचे काही दाखवू नका….कारण काही जण असे करू शकतील…अर्थात हे न कळण्याइतका, असे म्हणत अजित पवारांनी चुxx हा शब्द वापरला. पण तेवढ्यात अजित पवार म्हणाले, चुxx हा शब्द मी म्हणणार नाही. पण मला मूर्ख समजू नका आणि त्यांच्या या गोष्टीने उपस्थितांमध्ये हशा पिकला.

मुस्लिम समाजाच्या वतीने या कार्यक्रमात काही मागण्या केल्या होत्या. त्यावेळी यामध्ये एक निवेदन आले होते. या निवेदनात आम्हाला तुमचा सत्कार करायचा आहे, असे मत व्यक्त केले गेले. त्यावर अजित पवार म्हणाले, शादीखाना झाला, इतर ही कामे झाली. अहो, सत्कार काय करता? फक्त सत्कार? निवडणुकीला बटन दाबा! त्यामुळे उपस्थितांमध्ये पुन्हा एकदा हशा पिकला.
अजित पवार यांचे भाषण सुरू असताना अचानकच मध्यंतरात काही युवक कार्यकर्ते गटागटाने आले आणि त्यांनी एकच वादा अजित दादा अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यावेळी अजित पवारांचे भाषण सुरू होते. अजित पवारांनी त्यांना थांबा म्हटले, तरी कार्यकर्ते थांबत नव्हते. मग अजितदादा त्यांना म्हणाले. हो बरोबर, एकच वादा, पण तो लोकसभेच्या वेळी कुठे गेला होता? असा प्रश्न केला आणि उपस्थितांमध्ये पुन्हा एकदा हशा पिकला.