Manoj Jarange : विधानसभेत सुपडासाफ होईल, एक जागा येणार नाही; राणे पितापुत्रावर जरांगे संतापले

जालना, संजय आहेर : मी जर धमकी दिली तर महाराष्ट्रात कुठेच फिरता येणार नाही असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी नारायण राणेंना दिला आहे. भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मी मराठवाड्यात जाणार जरांगे काय करतो बघू असे विधान केले होते. याच विधानाचा जरांगे पाटील यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. नारायण राणेंना बोलायला लागलो तर मागे सरकरणार नाही, विनाकारण मला डिवचू नका. माझ्या नादाला लादू नका असं जरांगे यांनी म्हटले आहे.

निलेश राणे यांनी तोंड सांभाळून बोलावे उगाच माझ्या नादाला लागू नका, इतर कोणाच्या पण नादाला लागा पण माझ्या नादाला लागू नका. देवेंद्र फडणवीसांनी आता नवा नेता निवडला का मराठ्यांच्या अंगावर जाण्यासाठी, मराठ्यांचा नादाला लागू नका, मी जर धमकी दिली ना तर कुठेच फिरता येणार नाही, मराठवाड्यात सुद्धा, देवेंद्र फडणवीस एकटा नाही असे विधान करताय, म्हणजे तुम्ही सोबत आहात काय करणार आहात तुम्ही मराठ्यांना, मराठ्यांची फौज गोळा केले तर सुपडासाफ होईल. मस्तीत सत्तेचा गैरवापर करु नका एकही जागा येवू देणार नाही. शिस्तीत काम करा असा दमच जरागेंनी फडणवीसांना भरला आहे.
Parinay Fuke : जरांगेंनी विधानसभेच्या सर्वच्या सर्व जागा लढवाव्यात, आमदार परिणय फुकेंचा खोचक सल्ला

प्रकाश आंबेडकरांवर जरांगे काय म्हणाले

गरीबाला संधी आली गरीबाची लाट आहे, ते गोरगरीबाचे नेते आहेत त्यांनी गोरगरीबांना समजून घ्यावी. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मी मिळवून देणारच प्रकाश आंबेडकरांना इतकीच विनंती की त्यांनी गरीबांच्या बाजूने उभे राहावे आणि गरीबांना ताकद द्यावी अशी विनंती मनोज जरागेंनी आंबेडकरांना केली आहे.

दरम्यान देवेंद्र फडणवीसांनी नवीन पिल्लू आणलं का माझ्या विरोधात बोलायला राम कदमांवर बोलताना जरांगे पाटलांनी फडणवीसांवर टीका केलीये. जरांगे म्हणाले, देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राला संपवतोय वाटते, दोन नवीन चेहरे तयार केले वाटते. भाजपच्या शंभर टक्के लक्षात आले की जरांगेनी गेम केलाय म्हणून काही बरळू लागले. मिडीयामध्ये काही भुकू दे मी यांना उद्यापासून उत्तर देणार नाही अशी ठाम भूमिका जरांगे यांनी मांडली. शंभर टक्के त्यांना माहित आहे आपण सत्तेच्या बाहेर गेलो म्हणून अशी बडबड करतायत असे म्हणत राम कदम यांच्या टीकेला जरांगेंनी प्रत्युत्तर दिले.

Source link

bjpDevendra Fadnavismanoj jarange on narayan ranemanoj jarange on nitesh ranemaratha samajनारायण राणेनितेश राणेमनोज जरांगेमराठा आरक्षणविधानसभा
Comments (0)
Add Comment