चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथील मालू कापड दुकान पेट्रोल बॉम्बस्फोट प्रकरणातील फरार असलेल्या मुख्य आरोपीस अखेर एका महिन्याने नागपूर येथून अटक करण्यात पोलिसांना यश मिळालं आहे. सुरज गुप्ता (वय ३१) असं आरोपीचं नाव आहे. या प्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. मालू कापड दुकानात आरोपी सूरज गुप्ता याने पेट्रोल बॉम्ब टाकला होता. या घटनेने परिसरात खळबळ उडाली होती. त्याच दरम्यान सुरज फरार झालला होता.बल्हारपूर शहरातील गांधी चौकात मालू यांचे कापड दुकान आहे. आठवडाभरापूर्वी सुरज गुप्ता याने दुकानात पेट्रोल बॉम्ब टाकला होता. या घटनेनं एकच खळबळ उडाली होती. यातील चार आरोपींना पोलिसांनी अटक केली. मात्र संजय गुप्ता हा फरार झाला होता. फरार झालेला आरोपी नागपुरात लपून बसल्याची गुप्त माहिती बल्हारपूर पोलिसांना मिळाली. माहितीच्या आधारे बल्हारपूर पोलिसांचे एक पथक नागपूरला रवाना झाले. नागपूरचा धरमपेठ येथून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.
मुख्य आरोपी सापडल्याने बॉम्ब टाकण्याचे कारण पुढे येणारं आहे. पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू, उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक साखरे यांच्या मार्गदर्शनात ही कार्यवाही पोलीस निरीक्षक आसिफ राजा शेख, पोलीस उपनिरीक्षक गोविंद चाटे, ए. एस. आय डोईफोडे, मेघा आंबेकर, कल्याणी पाटील यांनी केली. दरम्यान, जिल्ह्यात गोळीबार, बॉम्ब टाकण्याचा घटना घडल्या आहेत. या घटनांनी देखील जिल्हा हादरला होता.अशी घडली घटना
मुख्य आरोपी सापडल्याने बॉम्ब टाकण्याचे कारण पुढे येणारं आहे. पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू, उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक साखरे यांच्या मार्गदर्शनात ही कार्यवाही पोलीस निरीक्षक आसिफ राजा शेख, पोलीस उपनिरीक्षक गोविंद चाटे, ए. एस. आय डोईफोडे, मेघा आंबेकर, कल्याणी पाटील यांनी केली. दरम्यान, जिल्ह्यात गोळीबार, बॉम्ब टाकण्याचा घटना घडल्या आहेत. या घटनांनी देखील जिल्हा हादरला होता.
अशी घडली घटना
बल्लारपूर येथील यश आणि अभिषेक मालू यांचे शॉपिंग मॉल आहे. सकाळी दुकान उघडण्यासाठी त्यांचे दोन नोकर गेले आणि त्यांनी दुकान उघडले. त्याचवेळी दुकानाच्या आत पेट्रोल बॉम्ब टाकला गेला. हल्लेखोरांनी गोळीबार केला. यानंतर हल्लेखोर पळून गेले. गोळीबारात एक नोकर जखमी झाला होता. या घटनेनं जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती.
ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याच्या घरी ४० जिवंत काडतुसं
दरम्यान, युवासेनेचा (उबाठा) पदाधिकाऱ्याच्या घरातून ४० जिवंत काडतूस, तलवार, वाघनखं, सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. विक्रांत सहारे असं आरोपीचं नाव आहे. ही कार्यवाही शुक्रवारच्या मध्यरात्री शहर पोलिसांनी केली. चंद्रपूरात गोळीबारच्या घटनेत वाढ झाल्याचे भयावह चित्र निर्माण झाले आहे. दोन दिवसापूर्वी कंबरेला देशीकट्टा लटकवून फिरणाऱ्या युवकाला पोलिसांनी अटक केली होती. शहरात सापडून येणाऱ्या शस्त्रांमुळे शहरवाशीय भयभीत झाले आहे.