कालसर्प योगाची पूजा करताना रामकुंडाजवळ पाय घसरला, इंजिनिअर तरुण गोदावरीत वाहून गेला

म. टा. प्रतिनिधी, नाशिक : गोदावरीच्या पाणीपातळीत वाढ झाली असताना धार्मिक विधीसाठी रामकुंड परिसरात गेलेल्या यग्नेश पवार (वय २९, रा. ओझर) यांचा पाय घसरल्याने ते वाहून गेले. रविवारी सकाळी अकरा वाजता ही घटना घडली. महावितरणमध्ये इंजिनियर म्हणून कार्यरत असून सध्या भुसावळ येथे नेमणूक होती. नीलकंठेश्वर मंदिर येथे काल सर्प योग पूजेनिमित्त आले होते. मात्र गोदावरी नदीत पूजन करताना पाय घसरून नदीत पडून वाहून गेले.

रविवारी (दि. ४) पहाटेपासूनच गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ झाली. सकाळी आठ वाजेपासून धार्मिक विधींसाठी भाविकांची गर्दी झाली होती. नाशिककरांनीही पूरस्थिती पाहण्यासाठी गर्दी केल्याने पोलिसांनी तातडीने धाव घेत बंदोबस्त तैनात केला. पंचवटी पोलिसांसह वाहतूक पोलिसांच्या पथकांनी गोदावरी नदीपात्राला सुरक्षेच्या दृष्टीने वेढा घातला. मात्र, त्यावेळी नीलकंठेश्वर मंदिरात धार्मिक विधी पूर्ण केल्यानंतर रामकुंड परिसरात विधी करीत असताना पवार यांचा तोल गेला.

ते पुरात वाहून गेल्याचे कळताच अग्निशमन दलासह बचाव पथकाला पाचारण करण्यात आले. सायंकाळी उशिरापर्यंत त्यांचा शोध घेण्यात आला. दरम्यान, या घटनेनंतर गोदातीरावरील सुरक्षेत आणखी वाढ करण्यात आली. परंतु, पर्यटकांसह भाविकांचा अतिउत्साह किरकोळ दुर्घटनांना कारणीभूत ठरल्याचा प्रत्यय आला.

मुलगी थोडक्यात बचावली

दुपारी दीड वाजेच्या सुमारास तीन वर्षीय मुलगी तिच्या कुटुंबीयांसह रामकुंड परिसरातील पायऱ्यांजवळ उभी होती. तोल गेल्याने ती नदीपात्रात बुडाली. मुलीला वाचविण्यासाठी तिच्या आईने नदीपात्रात उडी घेतली. त्यापाठोपाठ बचाव पथकासह त्यांच्या नातलगांनी पुढाकार घेत तातडीने दोघींना पात्राबाहेर काढले. त्यामुळे मुलगी थोडक्यात बचावली. नदीपात्राबाहेर आलेल्या मुलीला अश्रू अनावर झाले. या घटनेनंतर पोलिसांनी पर्यटकांसह भाविकांना समज देत अनेकांना दटावले.
Goregaon Couple Death : लेकाकडे जायला विमानाची तिकिटंही काढलेली, त्याआधीच अघटित, गोरेगावच्या पेडणेकर दाम्पत्याचा शेवट
दमदार पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या नाशिक जिल्ह्याला मागील दोन दिवसांच्या पावसाने मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात शनिवार पाठोपाठ रविवारी दमदार पावसाचा मुक्काम कायम असून, सुरगाण्यासह पेठ आणि इगतपुरीत २४ तासांमध्ये अतिवृष्टी नोंदविली गेली. सुरगाण्यात तब्बल १२२ मिमी, पेठमध्ये ९४, तर इगतपुरी तालुक्यात ८६ मिमी पाऊस नोंदविला गेला. त्र्यंबकेश्वरमध्येही ६५.३ मिमी पावसाची नोंद झाली. रविवारी दिवसभर पावसाचा जोर कायम राहिला. पाच तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली.
Wardha Student Suicide : परीक्षेला बसता येईना, I Quit चा मेसेज, MBBS विद्यार्थिनीची आत्महत्या, विद्यार्थ्यांचा कँडल मार्च

२० मंडळांमध्ये धुव्वाधार

जिल्ह्यात १५ तालुक्यांमध्ये मिळून सरासरी ३७ मिमी पावसाची नोंद झाली असली तरी काही मंडळांमध्ये धुव्वाधार पाऊस झाला आहे. त्यामुळे अशा एकूण २० मंडळांमध्ये २४ तासात ६५ मिमीपेक्षा अधिक पाऊस नोंदविला गेला. सुरगाणा आणि उंबरठाणा या दोन मंडळांमध्ये २४ तासांत विक्रमी १७१.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. खालोखाल इगतपुरी तालुक्यातील घोटी येथेही १४०.८ मिमी पाऊस झाला. धारगाव, हरसूल आणि ठाणापाडा या तीन मंडळांत १०० मिमी पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे.

Source link

godavari riverNashik Engineer drownNashik newsNilkantheshwar Templeकालसर्प दोष पूजागोदावरी नदी तरुण बुडालानाशिक गोदावरी नदी अपघातनाशिक नदी तरुण मृत्यूमहावितरण इंजिनिअर मृत्यू
Comments (0)
Add Comment