पैलवानांचा १२ महिने व्यायाम, मीही एकामागून एक निवडणुका लढवतो, श्रीगोंद्यात कर्डिलेंचा शड्डू?

प्रसाद शिंदे, अहमदनगर : भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी राहुरी आणि संगमनेर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे राहुरी विधानसभा मतदारसंघावर दावा असणारे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांची प्रतिक्रिया विचारण्यात आली. ही लोकशाही आहे, त्यामुळे लोकशाहीत प्रत्येकाला इच्छा व्यक्त करण्याचा अधिकार आहे, मात्र याबाबत पक्ष निर्णय घेईल, असं सूचक उत्तर शिवाजी कर्डिले यांनी दिलं आहे.

माजी आमदार शिवाजी कर्डीले हे श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतील अशीही चर्चा सुरु झाली आहे. याबाबत विचारले असता पक्षाने आदेश दिल्यास कोणत्याही मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची माझी तयारी आहे. मला पैलवानकीचा छंद आहे, त्यामुळे पैलवानाला बाराही महिने व्यायाम करावा लागतो, तरच तो फडात यशस्वी होतो. तसाच मी एक निवडणूक संपली की पुढच्या निवडणुकीची तयारी करतो, असंही कर्डिले म्हणाले.
Ladki Soonbai : आहात कुठे? बारामतीत ‘लाडकी सूनबाई’ योजना लागू, भरपेट जेवण मिळणार, नियम आणि अटी काय?
दरम्यान श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून सध्या भाजप नेते बबनराव पाचपुते हे आमदार आहेत. याच मतदारसंघातून शिवाजी कर्डिले यांचंही नाव समोर येत असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
Sanjay Raut : तुम्हारे जैसे कुत्ते भौकते है, शेर खुलेआम ठोकते है, माझा नेता उद्धव ठाकरे, नादी लागू नका, संजय राऊतांची डरकाळी
दुसरीकडे, मला आता वेळ आहे, शेजारी कुठे संधी मिळाली तर विधानसभा लढवण्याचा माझा प्रयत्‍न असेल, ज्‍या तालुक्‍यात उमेदवारीबाबत समन्‍वय होणार नसेल, अशा मतदारसंघात माझ्या नावावर एकमत झालं, तर मी निश्चित निवडणूक लढवण्‍यास तयार आहे. श्रीरामपूर राखीव असल्‍याने संगमनेर आणि राहुरी हेच माझ्यासमोर पर्याय असल्‍याचे सूचक वक्‍तव्‍य भाजपचे माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी माध्‍यमांशी बोलताना केलं होतं.

शिर्डी विधानसभा मतदारसंघात सुरु असलेल्‍या दौऱ्यांबाबतही सुजय विखेंनी काही गोष्‍टी स्‍पष्‍ट केल्‍या. या मतदारसंघातून मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील हेच निवडणूक लढवणार आहेत. आमच्‍या कुटुंबाच्‍या दृष्‍टीने सुद्धा सर्वपरी तेच आहेत. त्‍यामुळे मी शिर्डीतून निवडणूक लढवेन, ही चर्चा निष्‍फळ आहे. लोकतांत्रिक प्रक्रीयेत सर्वांनाच उमेदवारी मागण्‍याचा आधिकार आहे. भारतीय जनता पक्षाचे वैशिष्‍ट हेच आहे. पक्षाकडे सामान्‍य कार्यकर्ता उमेदवारी मागू शकतो. नगर दक्षिणमध्‍ये आमदार राम शिंदे यांच्‍यासह अनेकजण इच्‍छुक होते. त्‍याच पध्‍दतीने विधानसभेला कोणी उमेदवारी बाबत इच्‍छा व्‍यक्‍त केली असेल तर, यात गैर काही नाही अशी प्रतिक्रीया त्‍यांनी व्‍यक्‍त केली.

Source link

Babanrao PachputeMaharashtra politicsVidhan Sabha Election 2024शिवाजी कर्डिलेश्रीगोंदा विधानसभा मतदारसंघसुजय विखे पाटील
Comments (0)
Add Comment