बदलापूरच्या केमिकल कंपनीत ब्लास्ट, रिअ‍ॅक्टरचा रिसिव्हर उडून घरावर कोसळला, तिघांवर संकट

बदलापूर: बदलापूरच्या माणकिवली एमआयडीमधील एका रासायनिक कंपनीत पहाटेच्या सुमारास एक भला मोठा स्फोट झाल्याची माहिती आहे. या स्फोटामुळे कंपनीला भीषण आग लागली आणि संपूर्ण कंपनी जळून खाक झाली आहे. हा स्फोट इतका भयानक होता की रिअ‍ॅक्टरचा रिसिव्हर उडून तब्बल ४०० मीटर लांब असलेल्या एका चाळीवर जाऊन कोसळला. त्यामुळे एका कुटुंबातील लहान मुलगी आणि तीचे आईबाबा असे तिघे जखमी झाले आहेत.साधारण शंभर किलो वजनाचा रिअ‍ॅक्टर घरावर कोसळला तेव्हा त्यावेळी या घरातील सर्वजण गाढ झोपेत होते. हा रिअ‍ॅक्टर कोसळल्यामुळे महिलेचा एक पाय कायमचा निकामी झाला आहे. याशिवाय, तिच्या दुसऱ्या पायालाही मार लागला आहे. दरम्यान सदर स्फोट कशामुळे झाला याची माहिती पोलीस आणि अग्निशमन अधिकारी घेत आहेत.
Pooja Khedkar: न्यायालयाकडून झटका, तरी पूजा खेडकरांची पुन्हा हायकोर्टात धाव, यावेळी UPSC विरोधात रिट याचिका

नेमकं काय घडलं?

बदलापूरच्या माणकिवली एमआयडीसीत रेअर फार्मा नावाची कंपनी आहे. रेअर फार्मा कंपनीत केमिकल्स उत्पादन केलं जातं. सोमवारी (५ ऑगस्ट २०२४) पहाटे साडे चार वाजताच्या सुमारास कंपनीत रिअ‍ॅक्टरमध्ये प्रक्रिया सुरू होती. त्यावेळी अचानक रिसिव्हरमध्ये एक मोठा स्फोट झाला. यानंतर तिथेच असलेल्या मिथेनॉल या ज्वलनशील पदार्थांच्या ड्रम्सने सुद्धा पेट घेतला आणि कंपनीत भीषण आग लागली. काहीच वेळात ही आग वाढत गेली आणि रेअर फार्मा कंपनी आगीत भस्मसात झाली.

दरम्यान, हा स्फोट इतका भीषण होता की रिअ‍ॅक्टर सोबत असलेला रिसिव्हर उडून माणकिवली गावातील एका चाळीवर जाऊन कोसळला. या चाळीतील एका कुटुंबातील तिघेजण एक पुरुष, महिला आणि लहान मुलगी हे या घटनेत गंभीर जखमी झाले. यामध्ये महिलेचा एक पाय कायमचा निकामी झाला आहे. तर दुसऱ्या पायालाही दुखापत झाली आहे.

या तिघांपैकी दोघांना मुंबईच्या केईएम हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलं आहे. तर एकावर बदलापूरमध्येच उपचार सुरू असल्याची माहिती अग्निशमन अधिकारी भागवत सोनोने यांनी दिली आहे. दरम्यान, सदर स्फोट नेमका कसा झाला आणि त्याचं कारण काय याची माहिती पोलीस आणि अग्निशमन अधिकारी घेत आहेत.

Source link

badlapur chemical company blastMumbai News Liverare pharma companyThane newsकेमिकल कंपनी ब्लास्टबदलापूर केमिकल कंपनी ब्लास्टबदलापूर केमिकल कंपनी स्फोटबदलापूर ब्लास्ट
Comments (0)
Add Comment