चव्हाण पुढे म्हणाले की, महाराष्ट्रातील गरीब आणि उपेक्षितांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी दिलेले हे सामाजिक आरक्षण आहे. राज ठाकरे यांच्या पक्षाची भुमिका वेगळी असू शकते, पण देशात जे आरक्षण आहे ते टिकले पाहिजे, ही भाजपाची भूमिका असल्याचे अशोक चव्हाण म्हणाले. माथी भडकवण्याचे काम होऊ नये. सामजिक सलोखा राहिला पाहिजे. वक्तव्य करताना कोणाची मन दुखावू नये याची काळजी घ्यावी, असा सल्ला अशोक चव्हाण यांनी राज ठाकरे यांना दिला.
आंबेडकरांनी मराठा समाजात फूट पाडण्याचे काम करू नये
कुणबी मराठा उमेदवाराला ओबीसींनी मतदान करू नये, असे वक्तव्य अॅड प्रकाश आंबेडकर यांनी केले होते. त्यावर अशोक चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली. आंबेडकरांचे हे वक्तव्य अतिशय दुर्दैवाचे आहे. राज्यातील जबाबदार नेत्यांनी अशा प्रकारची वक्तव्य करून जातीजातीत, समाजात, विशेषत: मराठा समाजात फूट पाडण्याचे काम करू नये असे ते म्हणाले.
मराठा समाज एकत्र आहे . मराठा समाजात वाद विवाद राहिला नाही. अशा प्रकारच्या वक्तव्यातून मराठा समाजातले अंतर्गत संबंध खराब करण्याचे काम होत असेल तर ते बरोबर नाही, असे चव्हाण म्हणाले. जबाबदार लोकांनी काळजी घेतली पाहिजे, महाराष्ट्रात जातीय सलोखा कायम राहिला पाहिजे, निवडणुका आज आहेत, उद्या संपून जातील पण जी दरी निर्माण होते, ती वर्षानुवर्षे तशीच राहते. समाजात अंतर्गत फूट पाडण्याचे काम कोणी करू नये अशी माझी विनंती असल्याचे चव्हाण म्हणाले.
माजी खासदार चिखलीकर नाराज नाहीत
लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर हे नाराज असल्याची चर्चा आहे. रविवारी भोकर मतदारसंघात पार पडलेल्या जिल्हा अधिवेशन कार्यक्रमात चिखलीकर गैरहजर होते. यावर अशोक चव्हाणांना विचारले असता चिलखलीकर हे नाराज नसल्याचे ते म्हणाले. चिखलीकर हे भाजपात आहेत आणि ते आज कंधार लोहामध्ये असतील अशी प्रतिक्रिया चव्हाण यांनी दिली.