Vidhan Sabha Election : ‘झोपलेला पक्ष’ म्हणत आदित्य ठाकरे कडाडले! काकाच्या दौऱ्यावर पुतण्याची विखारी टीका

मुंबई : विधानसभेच्या तोंडावर राज ठाकरे यांचा महाराष्ट्र दौरा आजपासून सुरु झाला आहे. राज ठाकरे यांचा दौऱ्यावर आदित्य ठाकरेंनी तिखट प्रतिक्रिया देत थेट मनसे पक्षाला झोपेतून उठलेला पक्ष असा खोचक टोला लगावला आहे. लोकसभेत महायुतीला राज ठाकरेंच्या मनसेने पाठिंबा दिल्यानंतर ‘बिनशर्ट’ असे म्हणत आदित्य ठाकरेंनी मनसेला डिवचले होते. आता विधानसभेत ‘एकला चलो रे’ चा नारा देत राज ठाकरे विधानसभेच्या रिंगणात उतरले आहे. पण राज ठाकरे यांनी अप्रत्यक्षरित्या आदित्य ठाकरेंच्या विरोधात उमेदवार देणार असे स्पष्ट संकेत दिले आहेत.

आता बारामतीत एक काका पुतण्या जोडी असताना, राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे या काका पुतण्याची दुसरी जोडी विधानसभेच्या रिंगणात एकमेंकावर आरोपप्रत्यारोप करताना दिसण्याची शक्यता आहे. राज ठाकरे यांच्या दौऱ्यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, पाच वर्षांनतर पक्ष उठला आहे, त्यानंतर आता महाराष्ट्र दौरे सुरु झालेत, सुपारी पक्ष त्याचे काम करतील आणि आम्ही आमचे काम करु. कोरोना काळात किंवा मुंबईत चांगले वाईट काय घडत असताना पक्ष दिसतो तरी का? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
Worli Vidhan Sabha : आदित्य ठाकरेंच्या विरोधात मनसे उमेदवार देणार, शिंदे – ठाकरेंच्या भेटीत काय ठरले?

वरळी मतदारसंघावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

सीएम शिंदे आणि राज ठाकरे यांच्या भेटीनंतर वरळी विधानसभा मतदारसंघ चर्चेत आला आहे. आगामी विधानसभेत राज ठाकरे पुतण्या आदित्य ठाकरेंच्या विरोधात निवडणुकीत उमेदवार उतरवणार अशी माहिती समोर येत आहे. संदीप देशपांडे यांच्या नावाची दबक्या आवाजात चर्चा सुरु झाली आहे. यावर पत्रकरांनी आदित्य ठाकरे यांना विचारले असते आदित्य ठाकरे म्हणाले, मला वाटले माझ्या विरोधात जो बायडन लढतील असा मिश्कील टोला आदित्य ठाकरेंनी लगावला.

राज ठाकरेंचा महाराष्ट्र दौरा कसा असेल

रविवारपासून राज ठाकरेंचा महाराष्ट्र दौरा सुरु झाला आहे. आज सोलापूरात ठाकरे असून, आज सकाळी नऊपासून त्यांनी निरीक्षक आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या आहेत. आज सायंकाळी ठाकरे धाराशीवला मुक्कामी जातील. दुसऱ्या दिवशी धाराशीव येथील शासकीय विश्रामगृहात निरीक्षक आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतील आणि लातूर येथे मुक्कामाला जातील. सात ऑगस्ट रोजी लातूरच्या शासकीय विश्रामगृहात बैठका घेऊन नांदेडला रवाना होतील.

आठ ऑगस्ट रोजी नांदेडच्या शासकीय विश्रामगृहात बैठका घेऊन हिंगोली मुक्कामी जातील. दुसऱ्या दिवशी बैठक घेऊन परभणीला मुक्कामी असतील. तिथून बीड, जालना येथे बैठका घेऊन १२ ऑगस्ट रोजी शहरात येतील आणि १३ रोजी शासकीय विश्रामगृहात बैठका घेतील आणि संध्याकाळी विमानाने मुंबईला रवाना होतील.

Source link

aditya thackeray on mnsMaharashtra politicsraj thackeray maharashtra douraraj thackeray on worli vidhan sabha seatआदित्य ठाकरेराज ठाकरेवरळी विधानसभा मतदारसंघविधानसभा निवडणूक
Comments (0)
Add Comment