कोण आहेत भाऊसाहेब आंधळकर
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा राजीनामा देत, एकनाथ शिंदे गटात प्रवेश करणारे निवृत्त पोलीस अधिकारी भाऊसाहेब आंधळकर शिंदेंची साथ सोडत. मे २०२४ मध्ये वंचित पक्षाकडून धाराशिव लोकसभा मतदारसंघातुन निवडणूक लढवली होती. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत असताना,लोकसभेची उमेदवारी मिळणे अवघड होते,मात्र वंचितकडे उमेदवारी इच्छा व्यक्त करताच डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी तेरा तासात वंचितकडून भाऊसाहेब आंधळकर यांना उमेदवारी दिली होती.
प्रकाश आंबेडकरांचे विधान चर्चेत
ओबीसी संघर्ष यात्रा यवतमाळयेथे असताना,डॉ प्रकाश आंबेडकर यांनी मोठं वक्तव्य केले होते. कुणबी मराठे हे खरे ओबीसी नाहीत,कुणबी मराठा आमदाराकडून सावध रहा.”कुणबी हा स्वतःला ओबीसी म्हणत असला तरी तो सभागृहात मराठ्यांसोबत आहे, असं सांगतो. तो धनगरांसोबत नाही, तो माळ्यांसोबत नाही, तो वंजारी, लिंगायत, बंजारा यांच्यासोबत नाही. तो तेली, तांबोळी, कुणबी, लोहार, सोनार यांच्यासोबत नाही. म्हणून मी तुम्हाला सावध रहा असं सांगत आहे. ओबीसी आरक्षणाला धोका आहे. येणाऱ्या निवडणुकीनंतर हा धोका निर्माण होईल, असे विधान प्रकाश आंबेडकरांनी केले होते. विधानसभा निवडणुकीत मराठा कुणबी उमेदवाराला मतदान करू नका असे आवाहनही प्रकाश आंबेडकर यांनी केले होते.
मनोज जरांगेंवरील आरोपांमुळे दिला तडकाफडकी राजीनामा
याच विधानानंतर बार्शी तालुक्यातील धाराशिव लोकसभा मतदारसंघातुन निवडणूक लढवणारे वंचितचे नेते आणि निवृत्त पोलीस अधिकारी भाऊसाहेब आंधळकर यांनी मराठा समाजासाठी वंचितचा राजीनामा दिला. प्रकाश आंबेडकर यांनी मराठा समाजातील नेत्यांना आणि ओबीसी नेत्यांना विश्वासात घेऊन ओबीसी संघर्ष यात्रा काढणे गरजेचे होते. मराठा आरक्षणासाठी जीवाचा रान करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात प्रकाश आंबेडकर यांनी वेळोवेळी केलेल्या वक्तव्याने राजीनामा देत असल्याच जाहीर करत भाऊसाहेब आंधळकर यांनी वंचितचा राजीनामा दिला आहे.