मुंबई : प्रेम आणि युद्धात सारे काही माफ आहे अशी म्हण जरी प्रत्यक्षात असली तरी मुंबईत एका पत्नीने थेट पतीच्या प्रेयसीला धडा शिकवण्यासाठी एक वेगळाच मार्ग अवलंबला आणि पुढे जे काही घडले ते पाहून सारेच हादरले. मुंबईत नव्याने आलेले दांपत्य विनोद आणि प्रियंका (बदलेली नावे) शहरातील एक प्रशस्त इमारतीती राहण्यासाठी गेले. विनोद आणि प्रियंकाला दोन गोंडस मुले सुद्धा होती. पण क्षणात सारे काही होत्याचे नव्हते झाले. पत्नी प्रियंकाला आपल्या पतीचे बाहेर सुरु असलेले अनैतिक विवाह संबंध समजले आणि प्रेमाच्या कथेचे रुपांतर थेट क्राइम न्यूज मध्ये झाले.
२०१७ साली विनोद आणि प्रियंका मुंबईला राहण्यासाठी आले होते.एकदिवस विनोदची नजर त्याचाच इमारतीत राहणाऱ्या साधना(बदलेले नाव) वर गेली आणि हळहळू त्याची मैत्री वाढली. दोघांना एकमेकांचा सहवास आवडू लागला. हळहळू मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. एक दिवस जेव्हा प्रियंका आपल्या मुलांसोबत बाहेर फिरायला गेली होती तेव्हा विनोदने साधनाला घरी बोलवले आणि एकांतात वेळ घालवला.यानंतर असेच दोघेही एकमेकांना प्रियंका घरी नसताना भेटू लागले.
जवळपास सात ते आठ वर्ष अश्याप्रकारे अनैतिक विवाहसंबंध सुरु होते पण मागील महिन्यात १५ जुलैला साधनाला एक फोन आला आणि तिच्या पायाखालची जमीन सरकली, कारण कॉल होता प्रियंकाचा. साधनाने विनोदशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण विनोदचा कॉल काही कारणास्तव लागला नाही. प्रियंकाने साधनाला घरी भेटण्यासाठी बोलावले. घाबरलेली साधना घरी पोहचली पण सत्य पाहताच तिला मोठा धक्का बसला.
प्रियंकाच्या फोन मध्ये विनोद आणि साधनाचे अनेक असे प्रायव्हेट क्षण कैद झाले होते. फोटो आणि व्हिडिओ पाहून साधना बिथरुन गेली. तिने विनोद आणि प्रियंकाला फोटो आणि व्हिडिओ डिलिट करण्याची विनंती केली. पण चिडलेल्या विनोदच्या बायकोने साधनाचे सारे फोटो तिच्या नातेवाईक आणि मित्रपरिवाराला पाठवले. काहीच वेळात सोशल मीडियावर साधनाचे फोटो आणि व्हिडिओ टाकले.
साधना बदनामीमुळे अतिशय घाबरली पण पोलीसांकडे तक्रार देण्याची हिम्मत तिच्यामध्ये होत नव्हती. मागील आठवड्यात एका नातेवाईकांनी फोन करुन साधनाला माहिती दिली की साधनाचे व्हिडिओ एका पोर्न साइटवर अपलोड करण्यात आले आहे. याप्रकरणाची माहिती मिळताच साधना आणखी घाबरली आणि तिने थेट पोलीस स्टेशन गाठत विनोद आणि प्रियंकाविरोधात तक्रार नोंदवली. पोलिसांना सुद्धा सर्व प्रकार ऐकून धक्का बसला. पोलीसांनी अखेर भारतीय दंड न्यायसंहिता आणि आयटी ऍक्टनुसार गुन्हा दाखल करुन घेतला आहे.