खरी शिवसेना एकनाथ शिंदेंचीच! आंबेडकरांनी सांगितला व्होटिंग पॅटर्न; स्ट्राईक रेटचंही विश्लेषण

अमरावती: शिवसेना पक्षफुटीनंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात कायदेशीर लढा सुरु आहे. सर्वोच्च न्यायालयानं तारखा पडत आहेत. लोकसभा निवडणुकीत दोन्ही गट एकूण १३ जागांवर भिडले. यातील ७ जागा शिंदेसेनेनं, तर ६ जागा ठाकरेसेनं जिंकल्या. या निवडणुकीत झालेल्या मतदानाचं विश्लेषण करताना वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेंचीच असल्याचं म्हटलं आहे. ते अमरावतीत पत्रकारांशी बोलत होते.

खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच असल्याचं लोकसभा निवडणुकीच्या निकालातून स्पष्ट झालेलं आहे. शिंदे आणि ठाकरेंचा स्ट्राईक रेट पाहिला तर शिंदे पुढे आहेत. याचा अर्थ त्यांची शिवसेना खरी आहे, असं विश्लेषण आंबेडकर यांनी केलं. याला आधार म्हणून त्यांनी दोन्ही पक्षांना मतदान करणाऱ्या वर्गांच्या विचारधारेचा मुद्दा मांडला. शिवसेनेचा मतदार शिंदेसेनेसोबत गेला. पण तसं ठाकरेंसोबत घडलं नसल्याचा निष्कर्ष त्यांनी काढला.
Devendra Fadnavis: लाडक्या बहिणींसाठी फडणवीसांचा ‘श्रावण प्लान’; ४ कोटी महिला मतदारांसाठी खास अभियान
शिवसेनेची पारंपरिक मतं एकनाथ शिंदेंसोबत राहिली. याचा अर्थ शिवसैनिक आता शिंदेंच्या शिवसेनेलाच खरी शिवसेना मानू लागले आहेत. उद्धव ठाकरेंचा स्ट्राईक रेट आरक्षणवादी आणि मुस्लिम मतदारांमुळे वाढलेला आहे. हे दोन्ही वर्ग धर्मवादी पक्षाचे मतदार नाहीत, याकडे आंबेडकरांनी लक्ष वेधलं. सेनेचा पारंपारिक मतदार ठाकरेंपासून दूर गेल्याचं त्यांनी अधोरेखित केलं.
Ajit Pawar: अजितदादांचा शिंदेंना कॉल, नाराजी व्यक्त; NCP सत्तेत असल्याची करुन दिली आठवण, कारण काय?
उद्धव ठाकरेंपासून त्यांचा जुना मतदार दुरावलेला आहे. पण हा मुद्दा काँग्रेसचे नेते मांडत नाहीत. काँग्रेसच्या नेत्यांकडे कणा असता, तर त्यांनी हा विषय मांडला असता. पण कणाच नसल्यानं काँग्रेसचा एकही नेता हा मुद्दा उपस्थित करत नाही, असं म्हणत आंबेडकरांना काँग्रेसलादेखील लक्ष्य केलं.

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं. मविआमधून सर्वाधिक जागा ठाकरेसेनेनं लढवल्या. एकूण २१ जागा लढवणाऱ्या ठाकरेंना ९ जागांवर यश मिळालं. त्यांच्या तुलनेत काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीची कामगिरी सरस झाली. महायुतीत सर्वाधिक स्ट्राईक रेट शिंदेंनी राखला. १५ जागा लढवत त्यांनी ७ जागांवर विजय मिळवला. या सातही जागा त्यांनी ठाकरेंच्या उमेदवारांचा पराभव करुन मिळवल्या.

Source link

Eknath ShindeMaharashtra politicsPrakash AmbedkarUddhav Thackerayउद्धव ठाकरेएकनाथ शिंदेप्रकाश आंबेडकरमहाराष्ट्र राजकीय बातम्यावंचित बहुजन आघाडी
Comments (0)
Add Comment