लोकसभेत भाजपचे पाणीपत, मुनगंटीवारांचा त्यांच्याच मतदारसंघात पराजय केल्यानंतर विधानसभेसाठीही काँग्रेसचे ‘महिला कार्ड’

चंद्रपूर : चंद्रपूर लोकसभा जिंकण्याची रणनीती भाजपने आखली होती. पक्षाच्या विविध अभियानांचा नारळ इथूनच फोडला गेला. भाजपच्या बड्या नेत्यांच्या सभा येथे झाल्या. मात्र निवडणुकीत भाजपचे पाणीपत झाले आणि सुधीर मुनगंटीवार यांचा अडीच लाख मतांनी पराभव झाला. सर्व सहा विधानसभा मतदारसंघात भाजप पिछाडीवर पडला. लोकसभेची पुनरावृत्ती विधानसभेत टाळण्यासाठी भाजप ॲक्शन मोडवर आहे. दुसरीकडे सुधीर मुनगंटीवार यांचा पराभव करण्यासाठी काँग्रेस ताकद लावणार आहे. लोकसभेप्रमाणेच विधानसभेत मुनगंटीवार यांच्याविरोधात काँग्रेस महिला उमेदवार देण्याची चर्चा आहे.

या महिला उमेदवाराची होतेय चर्चा

लोकसभेत मुनगंटीवार त्यांच्या बल्हारपूर विधानसभा क्षेत्रातूनच पिछाडीवर पडले. त्यामुळे महाविकास आघाडीतील घटक पक्ष आणि काँग्रेस येथून निवडणूक लढण्यास उत्सुक आहेत. त्यात एका महिला नेत्याच्या नावाची चर्चा रंगली आहे. त्या महिला आहेत डॉ.अभिलाषा गावतुरे, त्यांचे सामाजिक कार्य मोठे आहे. लोकसभेच्या निवडणूकीत खासदार प्रतिभा धानोरकर यांचा सोबत त्या खंबीरपणे उभ्या राहिल्या होत्या. लोकसभा निवडणूकीदरम्यान त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला होता.
Vidhan Sabha Election : ‘झोपलेला पक्ष’ म्हणत आदित्य ठाकरे कडाडले! काकाच्या दौऱ्यावर पुतण्याची विखारी टीका

कोण आहेत गावतुरे?

गावतुरे यांची जन्मभूमी नागपूर. त्यांनी इंधीरा गांधी मेडिकल कॉलेज येथून एमबीबीएसची पदवी घेतली. के. एम. हॉस्पिटल मुंबई येथून डिसीएच (बाल रोग तज्ज्ञ) ही पदवी घेतल्यानंतर त्यांनी चंद्रपूर येथे हॉस्पिटल सुरू केलं. मूलनिवासी महिला संघाच्या त्या महाराष्ट्र अध्यक्ष राहिल्या आहेत. जिजाऊ, सावित्री, रमाई मंचचे अध्यक्षपद, भूमिपुत्र ब्रिगेडच्या संस्थापक, इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्सच्या जिल्हा अध्यक्ष, भूमिपुत्र ब्रिगेड कामगार संघटनेच्या मार्गदर्शकाची भूमिका त्यांनी पार पाडली आहे. या विविध संघटनेच्या माध्यमातून सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे कार्य त्यांनी केलं आहे.
विधानसभा डोळ्यासमोर, श्रावण महिन्यात अनोखे अभियान, फडणवीस महिला भक्तांशी संवाद साधणार

जातीय समीकरणाचा फायदा

गायतुरे यांचे पती राकेश गावतुरे हे माळी समाजाचे तर त्या कुणबी समाजाच्या. मात्र त्यांचे वडील केशव बेहरे आणि शकुन या पुरोगामी विचाराच्या. बालपणापासूनच त्यांनी मुलीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची ओळख करून दिली. आंतरजातीय विवाह असला तरी त्यांच्या विवाहाला फारसा विरोध झालेला नाही. बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात माळी समाजाची मोठी संख्या आहे. त्या पाठोपाठ कुणबी समाजही आहे. अभिलाषा यांचे पती माळी समाजाचे तर त्या कुणबी समाजाच्या. जातीय समीकरणाच्या चष्म्यातून पाहिलं तर अभिलाषा गावतुरे सरस ठरत आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात सुद्धा त्यांचीच चर्चा होत असल्याचे वृत्त आहे.

Source link

ballarpur vidhan sabhabjpchandrapur newsCongresssudhir mungantiwarकाँग्रेस विरुद्ध भाजपाचंद्रपूरचे विधानसभा राजकारणबल्लारपूर विधानसभाविधानसभा निवडणूक 2024सुधीर मुनगंटीवार
Comments (0)
Add Comment