चार महिन्यांपूर्वी लग्न, मग पत्नीला अशा प्रकारे संपवलं की सारे हादरले, कारण काय?

जळगाव: लग्न होऊन चार महिने झाले चार महिन्यात सुखी संसार सुरू होता. मात्र घरगुती वादातून पतीने पत्नीला डोक्यात व तोंडावर लाकडी दांड्याने मारहाण करत जीवे ठार केल्याची घटना गोद्री तालुका जामनेर येथे रविवारी रात्री घडली. याप्रकरणी पतीसह तीन जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

काजल आणि विशाल यांचे चार महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. २८ एप्रिल रोजी तिचा विवाह झाला होता. चार महिन्यापर्यंत सुखी संसार वेलीवर बहरला होता. मात्र, घरात घरगुती वादातून पतीने पत्नीच्या डोक्यात व तोंडावर लाकडी दांड्याने मारहाण करीत पत्नीला ठार केले. ही घटना रविवारी रात्री घडली. सोमवारी सकाळी या महिलेचे नातेवाईक गोद्री येथे पोहोचले त्यावेळी खुनाचा हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पोलिसांनी पती विशाल चव्हाणसह तीन जणांना ताब्यात घेतलं आहे.
Kalyan Accident: भीषण! भीमाशंकरला निघाले, कल्याण-मुरबाड रस्त्यावर अर्टिगाची झाडाला जोरदार धडक, तिघांचा मृत्यू
काजल अव्यय १८ वर्षांची होती. मुसळी फाटा तालुका धरणगाव येथे तिचे माहेर आहे. याच वर्षी एप्रिल महिन्यात तिचा विवाह विशाल चव्हाण याच्याशी झाला होता. रविवारी रात्री पती-पत्नीत घरगुती कारणावरुन वाद झाला. हा वाद विकोपाला जाऊन विशालने काजलच्या डोक्यात तोंडावर नाकावर लाकडी दांड्याने मारहाण केली. यातच तिचा मृत्यू झाला. काजलच्या वडिलांना कुणीतरी फोन करून या घटनेची माहिती दिली. ते सोमवारी सकाळी जामनेरला पोहोचले त्यावेळी ही खुनाची घटना उघफकीस आली.

काजलचे वडील जयसिंग सुकलाल चव्हाण (वय ४५ राहणार मुसळी फाटा तालुका धरणगाव) यांच्या फिर्यादीत आपण ५० हजार रुपये दिले नाहीत म्हणून पतीने मुलीचा खून केला, असं म्हटलं आहे. याबाबत पती सासू-सासरे अशा तीन जणांविरुद्ध फत्तेपूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. विवाहितेला मारण्यासाठी वापरण्यात आलेले लाकूड जप्त करण्यात आलं असल्याची माहिती फत्तेपूर पोलीस उपनिरीक्षक गणेश फड यांनी दिली.

Source link

crime mewsHusband killed wifeJalgaonnewly married woman killed by husbandnewly wedsजळगाव क्राइमजळगाव न्यूजजळगाव बातम्यापती पत्नीपत्नीची हत्या
Comments (0)
Add Comment