तेज पोलीस टाइम्स : परवेज शेख
आंबेगाव, शिरूर, शिकापुर, रांजणगाव, खेड भागात मंदीर चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास जेरबंद, ११ मंदीर चोरी गुन्हयांची उकल करुन ४,००,०००/- रु किंमतीचा मुद्देमाल जप्त पारगाव (कारखाना) पोलीसांची उत्तम कामगीरी.
पुणे जिल्हयातील आंबेगाव, शिरूर, शिकापुर, रांजणगाव, खेड भागात मागील काही दिवसापासून मंदिर चोरीचे प्रमाण वाढल्याने मा. पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण श्री. पंकज देशमुख सोो यांनी पुणे ग्रामीण पोलीस दलास मंदिर चोरीचे गुन्हे उघडकीस आणन्याचे व प्रतिबंध करण्याचे आदेश दिले होते.
पारगाव (कारखाना) पोलीस ठाणे गु.र.नं. ११४/२०२४ भा.न्या.सं.२०२३ कलम ३३१ (४), ३०५(३) सदर गुन्हयाचा तपास चालू असताना पारगाव (कारखाना) पोलीस ठाण्याचे तपास पथक पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब लोकरे, पो.हवा. अमोल वडेकर, पो.कॉ. संजय साळवे व पो.कॉ. मंगेश अभंग हे सदर गुन्हयाचा तपास करीत असताना गेले काही महिन्यापासून वेगवेगळ्या पोलीस ठाणे हद्दीत जावुन मंदीर चोरीच्या गुन्हयांचे अनुषंगाने सी.सी.टी.व्ही. फुटेज चेक करीत असताना एक संशईत इसम चोरी करत असल्याचे आढळुन आले. सदर इसमाबाबत तांत्रिक दृष्टया तपास करून गोपनीय बातमीदारमार्फत माहिती मिळाली की, सी.सी.टी.व्ही. मधील इसम हा विनायक दामू जिते हा आहे. सदर आरोपी हा सराईत गुन्हेगार असल्याची खात्री पारगाव (कारखाना) पोलीसांना झाली. सदर इसम हा शिकापुर येथे येणार असल्याची गोपनीय माहीती मिळाली असता त्यास सापळा रचून शिताफिने पो.कॉ. संजय साळवे व पो.कॉ. मंगेश अभंग यांनी शिक्रापूर येथून ताब्यात घेवुन त्यास मंदिर चोरी बाबत विचारपुस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर त्यास अधिक विश्वासात घेवुन तपास केला असता त्याने मंदिर चोरीची कबुली दिली त्यामुळे आरोपी नामे विनायक दामू जिते रा. कान्हूर मेसाई ता. शिरूर जि.पुणे यांस वरील गुन्हयाचे अनुषंगाने दि. ३१/०७/२०२४ रोजी अटक केली. तो पोलीस कस्टडीमध्ये असताना मंदिर चोरी बाबत त्याचेकडे अधिक विचारपुर केली असता त्याने शिंगवे येथील भैरवनाथ जोगेश्वरी मंदिर, लाखणगाव येथील देवीचे मंदीर, मांदळेवाडी येथील हनुमान मंदीर, जारकरवाडी येथील बोल्हाई मातेचे मंदीर, असे पारगाव (कारखाना) पोलीस ठाणे हद्दीत चोरी केल्याचे सांगीतले. त्यास आणखी विचारपुस करून तपास केला असता त्याने शिकापुर येथील राउतवाडी येथील श्रीनाथ मस्कोबा मंदीर, शिकापूर येथील कवटेमळा येथील वडजाई माता मंदिर, खेड राजगुरूनगर येथील कन्हेरसर येमाई जुने ठाणे मंदिर, शिरूर सविंदणे येथील काळूबाई मंदीर, रांजणगाव फंडवस्ती येथील तुकाई माता देवीचे मंदिर, घोडेगाव शिंदेवाडी येथील खंडोबा मंदीर व कळमजाई मंदीर, तसेच अहमदनगर जिल्हयातील सुपा येथील तुकाई मंदीर वाडेगव्हाण पारनेर व नगर एम.आय.डी.सी. येथील श्री. खंडोबा मंदिर शिव मल्हारगड
पिंपळगाव माळी इत्यादी ठिकाणी रात्रीच्या वेळी मंदिर चोन्या केल्या असल्याचे सांगीतले आहे. सदर गुन्हयांच्या अनुषंगाने तपास करून गेला मुद्देमाल हा हस्तगत करण्यात आला आहे.
असे एकुण १,६३,०००/- रु किंमतीचे सोन्याचे दागिने, १,१७,०००/- रु किंमतीचे चांदी मुखवटे व पितळी धातूच्या वस्तु, ८०,०००/- रु व किंमतीचे इलेक
सदरची कामगीरी ही मा. पोलीस अधीक्षक श्री. पंकज देशमुख सोो, पुणे ग्रामीण, मा.अपर पोलीस अधीक्षक श्री. रमेश चोपडे सोो, पुणे विभाग, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, खेड विभाग श्री. अमोल मांडवे सो, पो.नि. अविनाश शिळीमकर स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक श्री. नेताजी गंधारे पारगाव (कारखाना) पोलीस ठाणे, श्री. भाऊसाहेब लोकरे पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार अमोल वडेकर, अविनाश कालेकर, दत्तात्रय जढर, देवानंद किर्वे, अजित मडके, पो.ना.शांताराम सांगडे, रमेश इचके, पो.कॉ. संजय साळवे, मंगेश अभंग, चंद्रकांत गव्हाणे, नवनाथ राधे, गजानन डाके, ओमनाथ तुमकुटे, राजेश उतळे, सर्व पारगाव (कारखाना) पोलीस ठाणे व पो.हवा. विकम तापकीर, पो.कॉ. निलेश सुपेकर, मंगेश थिगळे स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण, पोलीस मित्र रामभाऊ वाळुंज, लाखणगाव पोलीस पाटील कल्पना बोऱ्हाडे यांनी केली आहे.
पुणे ग्रामीण पोलीस