राज्य शासन आश्रम शाळेवरती लाखो रुपये खर्च करत असताना देखील विद्यार्थ्यांचा या ठिकाणी मृत्यू होत असल्याची घटना ही धक्कादाय आहे. सोमवारी मनवेल आश्रम शाळेतील नऊ वर्षीय मुलगा फुलसिंग बारेला याला शाळेत चक्कर आल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला. संतप्त जमावाने विद्यार्थ्याचा मृतदेह थेट आदिवासी प्रकल्प कार्यालयात घेऊन जात तेथील आदिवासी कार्यालयातील अधिकाऱ्यांना जाब विचारला.
आमदार शिरीष चौधरी यांनी जमावाची समजूत काढत आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी जळगावला हलवला. प्रकल्प अधिकाऱ्यांनी दोषींवर कारवाई करण्यासाठी शाळेच्या चौकशीचे आदेश दिल्यानंतर जमाव शांत झाला. याप्रकरणी यावल पोलिसांत आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मनवेल आश्रम शाळेतील इयत्ता तिसरीचा विद्यार्थी फुलसिंग पाडसिंग बारेला (वय ९ राहणार हिंगोणा तालुका यावल) हा शाळेत चक्कर येऊन पडला. हे निदर्शनास येतात शिक्षकाने तातडीने त्याला यावल ग्रामीण रुग्णालयात नेले असता वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रशांत जावळे यांनी मृत घोषित केले. विद्यार्थ्याच्या मृत्यूची बातमी समजतात अनेकांनी रुग्णालयात धाव घेतली. यासह अनेक राजकीय पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी देखील आदिवासी बांधवांनी बालकाचा मृतदेह थेट एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयात नेला. तर आमदार श्री चौधरी यांनी जमवायची समजूत काढली प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांनी दोषींवर कारवाई करण्यासह मनवेल शाळेच्या चौकशीचे आदेश दिले.
इन कॅमेरा शवविच्छेदन करणार
विद्यार्थ्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे समजण्यासाठी जमावाच्या मागणीनुसार सायंकाळी विद्यार्थ्यांचा मृतदेह जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय विद्यालयाच्या रुग्णालयात पाठवण्यात आला. तेथे इन कॅमेरा शविच्छेदन केले जाणार आहे.
विद्यार्थी रविवारपासून होता आजारी
फुलसिंग बारेला या विद्यार्थ्यांची प्रकृती रविवारी खराब होती. त्याच्यावर औषधउपचार करण्यात आले होते. त्यानंतर सोमवारी सकाळी पुन्हा त्याची तब्येत खालावली व चक्कर येऊन तो कोसळला व त्यात त्याचा मृत्यू झाला आहे.
सर्व विद्यार्थ्यांची होणार तपासणी
आरोग्य विभागाकडून तातडीने मनवेल आश्रम शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे आरोग्य तपासणी करण्यात आली तसेच विशेष पथकाकडून शाळेतील भोजन कक्षा संपूर्ण शाळा तपासण्यात आली आहे.
राज्य शासन आश्रम शाळेवरती लाखो रुपये खर्च करत असताना देखील अशा धक्कादायक घटना आश्रम शाळेत घडत आहेत यात प्रकल्प अधिकारी किंवा आश्रम शाळेतील कर्मचारी यात दोषी आहे का? याची देखील चौकशी करण्यात यावी अशी मागणी संतप्त जवानाने त्या ठिकाणी केली होती. विद्यार्थी रविवारपासून आजारी असल्याने त्याला चांगल्या डॉक्टरांकडे उपचारार्थ दाखल करण्यात यायला पाहिजे. मात्र, आश्रम शाळेतच त्या विद्यार्थ्यांची तपासणी करून त्याला औषध उपचार केले, जर विद्यार्थ्याला त्याच दिवशी चांगल्या डॉक्टरांकडे नेऊन तपासणी केली असती तर एखाद्या वेळेस या विद्यार्थ्यांचा जीव वाचला असता, असं म्हटलं जात आहे.