आमदार राजू पाटलांचा पलटवार
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दोऱ्यावर आदित्य ठाकरे यांनी टीका केली होती झोपलेला पक्ष, सुपारी बाज पक्ष या शब्दांत आदित्य ठाकरेंनी मनसेला डिवचले. यालाच उत्तर देताना मनसे आमदार राजू पाटील यांनी सांगितले की, त्यांनी पहिले मागे जेव्हा शिवसेनेच्या फुटलेल्या आमदारांवर खोक्यांचे आरोप केले होते तेव्हा त्या आमदारांनी देखील आरोप केलेले की आम्ही खोके घेतले परंतु यांच्या घरी आम्ही कंटेनर पोहचवले आहेत, ते कंटेनर कसले होते ? त्यांच्या सुपार्या होत्या की नारळ होते? याचे उत्तर द्यावं नंतर आमच्यावर बघावं ही त्याना विनंती आहे, असे पाटील म्हणाले.
आदित्य ठाकरे काय म्हणाले होते ?
“पाच वर्षानंतर पक्ष झोपेतून उठलेला आहे. ते निवडणुकीच्या काळात जागे होतात, मग महाराष्ट्र पिंजून काढणार, असे त्यांचे दौरे चालतात. सुपारीबाज पक्ष आहे ते त्यांचं काम करतील. आम्ही आमचं जनतेच्या सेवेचं काम करत आहोत. गेल्या पाच वर्षांच्या काळात मग त्यामध्ये कोविडच्या काळात किंवा मुंबईत इतर काही घटना घडत असताना हा पक्ष दिसला तरी का? त्यामुळे आम्ही त्यांच्याकडे जास्त लक्ष देत नाहीत. सुपारीबाज पक्ष आहे तो तिथेच राहिल”, असा हल्लाबोल आदित्य ठाकरेंनी मनेसवर केला होता..
राज ठाकरेंचा दौरा !
सात ऑगस्टला लातूरच्या शासकीय विश्रामगृहात बैठका घेऊन नांदेडला रवाना होतील. आठ ऑगस्ट रोजी नांदेडच्या शासकीय विश्रामगृहात बैठका घेऊन हिंगोली मुक्कामी जातील. दुसऱ्या दिवशी बैठक घेऊन परभणीला मुक्कामी असतील. तिथून बीड, जालना येथे बैठका घेऊन १२ ऑगस्ट रोजी शहरात येतील आणि १३ रोजी शासकीय विश्रामगृहात बैठका घेतील आणि संध्याकाळी विमानाने मुंबईला रवाना होतील.