बुधवार ७ ॲागस्ट २०२४, भारतीय सौर १६ श्रावण शके १९४६, श्रावण शुक्ल तृतीया रात्री १०-०५ पर्यंत, चंद्रनक्षत्र: पूर्वा फाल्गुनी रात्री ८-२९ पर्यंत, चंद्रराशी: सिंह उत्तररात्री ३-१४ पर्यंत, सूर्यनक्षत्र: आश्लेषा
पूर्वा फाल्गुनी नक्षत्र रात्री ८ वाजून ३१ मिनिटांपर्यंत त्यानंतर उत्तरा फाल्गुनी नक्षत्र प्रारंभ, परिधी योग सकाळी ११ वाजून ४१ मिनिटांपर्यंत त्यानंतर शिव योग प्रारंभ, तैतील करण सकाळी ९ वाजेपर्यंत त्यानंतर वणिज करण प्रारंभ, चंद्र मध्यरात्री ३ वाजून १५ मिनिटांपर्यंत सिंह राशीत त्यानंतर कन्या राशीत संचार करेल.
- सूर्योदय: सकाळी ६-१९
- सूर्यास्त: सायं. ७-१०
- चंद्रोदय: सकाळी ८-३१
- चंद्रास्त: रात्री ९-०८
- पूर्ण भरती: दुपारी १-५४ पाण्याची उंची ४.२९ मीटर, उत्तररात्री १-५३ पाण्याची उंची ३.८४ मीटर
- पूर्ण ओहोटी: सकाळी ७-०१ पाण्याची उंची ०.९७ मीटर, सायं. ७-५५ पाण्याची उंची १.३१ मीटर
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून २१ मिनिटे ते ५ वाजून ३ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ४० मिनिटांपासून ते ३ वाजून ३४ मिनिटांपर्यंत, निशिथ काळ मध्यरात्री १२ वाजून ६ मिनिटांपासून ते १२ वाजून ४८ मिनिटांपर्यंत. गोधुली बेला संध्याकाळी ७ वाजल्यापासून ७ मिनिटांपर्यंत ते ७ वाजून २९ मिनिटांपर्यंत. अमृत काळ सकाळी ७ वाजून २६ मिनिटांपासून ते ९ वाजून २६ मिनिटांपर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ दुपारी १२ ते दीड वाजेपर्यंत, सकाळी साडे दहा ते १२ वाजेपर्यंत गुलिक काळ, सकाळी साडे सात ते ९ वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ १२ वाजल्यापासून १२ वाजून ५३ मिनिटांपर्यंत
आजचा उपाय
शंभोशंकर आणि माता पार्वती यांची पूजा करुन मातेला श्रृंगाराच्या वस्तू अर्पण करा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)