नेमके आनंदराव अडसूळ काय म्हटले पाहा…
नवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राच्या विरोधात पुन्हा याचिका दाखल करणार. सुप्रीम कोर्टाने सुद्धा अडसूळांना विसरुन देशात अशा निकालाने काय परिणाम होईल हे पाहीले पाहिजे. कमेटीने घेतलला निर्णय कोर्ट अंतिम मानते मग असे असेल तर काहीजण पैसे देवून खोटे जात प्रमाणपत्र घेतील. कोर्टाने दखल घेवून पुन्हा निर्णयाविरोधात याचिका सुरु केली पाहिजे. तर सुप्रीम कोर्टात आम्ही पुर्निविचार याचिका दाखल करणार आणि राणांच्या जात प्रमाणपत्रांच्या निकालाविरोधात याचिका दाखल करणार. विधानसभेत रवी राणा काय करणार काय याचे मला घेणेदेणे नाही मी पक्षाकडे थेट अमरावतीतील बडनेरा, तिवसा आणि दर्यापूरसाठी मी शिंदेंकडे मागणी करणार असे अडसूळांनी स्पष्ट केले.
शहा आणि फडणवीसांना शब्द फिरवला
‘अमरावतीची जागा मूळची शिवसेनेची होती. आनंदराव अडसूळ यांनी लोकसभेवर अमरावतीचे प्रतिनिधित्व केले आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने ही जागा भाजपसाठी सोडली. त्या बदल्यात माझ्या वडिलांना राज्यपाल बनवण्याचे लेखी आश्वासन अमित शाह यांनी दिले होते. मात्र ते पाळले गेले नाही’ अशा शब्दांत अभिजित अडसूळ यांनी संताप व्यक्त केला. ‘आमच्यावर अन्याय झाला असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आम्ही चर्चा करणार आहोत’ तर आज खुद्द आनंदराव अडसूळांनी सुद्धा शाह आणि फडणवीसांवर नाराजी व्यक्त केली आहे.