VIDEO : एसी लोकलमधून चढता-उतरताना जीवाचे हाल, मध्य रेल्वेवरचा व्हिडिओ पाहून उडेल थरकाप

म. टा. प्रतिनिधी, मुंबई : ठाकुर्ली ते डोंबिवलीदरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक सोमवारी दुपारी अडीच तास ठप्प झाली. रेल्वेगाड्या एकापाठोपाठ एक उभ्या राहिल्याने सायंकाळी गर्दीच्या वेळेतील फेऱ्यांवरही परिणाम झाला. त्यामुळे अनेक रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी झाली होती.

डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरात दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ओव्हरहेड वायर तुटून जलद मार्गावरील रुळांवर लोंबकळत होती. याबाबत माहिती मिळताच दोन्ही जलद मार्गांवरील रेल्वे वाहतूक थांबवून दुरुस्ती काम सुरू करण्यात आले. ‘ओएचई’मधून उच्च दाबाने विद्युतप्रवाह सुरू असल्याने दिवा ते कल्याणदरम्यान अप-डाऊन जलद मार्गावर ब्लॉक घेण्यात आला.

साडेतीन वाजण्याच्या सुमारास अप जलद मार्गावरील वाहतूक ताशी १५ किमीच्या वेगाने सुरू करण्यात आल्या. सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास डाऊन जलद मार्ग सुरू करून रेल्वे वाहतूक पूर्ववत करण्यात आली, असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्निल निला यांनी सांगितले.
Central Railway : ठाकुर्लीला ओव्हरहेड वायर तुटली, लोकल वाहतुक ठप्प; आठवड्यात दुसऱ्यांदा रेल्वे विस्कळीत
लोकल गाड्या सुरू होऊन सायंकाळी सातपर्यंत दादर, घाटकोपर, विक्रोळी, मुलुंड, ठाणे स्थानकात चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली होती. सीएसएमटीहून येणाऱ्या लोकलगाड्या भरभरून येत असल्याने प्रवाशांना डब्यात प्रवेश करणे शक्य नव्हते. फलाटावरून रेल्वेडब्यात प्रवेश करताना महिलांसह ज्येष्ठ नागरिकांचे प्रचंड हाल झाले, अशी प्रतिक्रिया प्रवासी तन्मय देशमाने यांनी दिली.

ओव्हरहेड वायर तुटल्याने कसारा-कर्जतच्या लोकल फेऱ्या तासाभरापासून ठप्प होत्या. लोकल नसल्याने प्रवाशांनी रुळांवरूनच चालत ठाकुर्ली-कल्याण स्थानक गाठले. डोंबिवली रेल्वे पोलिस व ‘आरपीएफ’ने घटनास्थळी दाखल होत प्रवाशांना लोकलमधून उतरण्यास मदत केली. पाचच्या सुमारास वाहतूक सुरळीत करण्यात मध्य रेल्वेला यश आले, असे डोंबिवली रेल्वे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किरण उंदरे यांनी सांगितले.

२० लोकल फेऱ्या रद्द

मध्य रेल्वेच्या सुमारे २० लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या. रात्री उशिरापर्यंत लोकलचे वेळापत्रक कोलमडलेलेच होते. सीएसएमटी स्थानकात लोकलगाड्या विलंबाने दाखल होत होत्या. त्यामुळे अनेक रेल्वे स्थानकांवर चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली होती.

Source link

AC Mumbai Localcentral railwaymumbai local newsThane Railway station stampedeओव्हरहेड वायरठाणे स्टेशन लोकल व्हिडिओमध्य रेल्वे लोकल अपडेटमुंबई लोकल
Comments (0)
Add Comment