बिल्डिंगखालून जाताना अंगावर कुत्रा पडला, तीन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू; घटना cctvमध्ये कैद

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथे एका पाच मजली इमारतीतून तीन वर्षीय मुलीवर कुत्रा पडला. त्यामुळे उपचारादरम्यान मुलीचा मृत्यू झाला. मुलगी तिच्या आईसोबत रस्त्याने चालली होती, तेव्हा अचानक बिल्डिंगवरून एक कुत्रा तिच्या अंगावर पडला. या घटनेत कुत्राही जखमी झाला आहे. ज्याला एका प्राणीप्रेमी महिलेने उपचारासाठी रुग्णालयात नेले. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओही समोर आला आहे.

संपूर्ण घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद

सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. लोक रस्त्यावरून ये-जा करत आहेत. यादरम्यान ही मुलगीही तिच्या आईसोबत जात आहे. मुलगी पाच मजली इमारतीखालून जात असताना एक कुत्रा वरून खाली पडताना दिसतो, जो थेट मुलीवर पडतो. त्यामुळे मुलगी बेशुद्ध होते. त्याचवेळी कुत्राही खाली पडल्यानंतर काही वेळाने उठतो आणि जमिनीवरून उठून रस्त्याच्या कडेला जातो.
Body in Suitcase : दादरला सूटकेसमध्ये डेडबॉडी, मूकबधीर अ‍ॅनिमेटरकडून हत्येचं शूटिंग, मित्रांना व्हिडिओ कॉल केल्याचंही समोर

कुत्रा अंगावर पडल्याने मुलगी बेशुद्ध झाली

ही घटना मुंब्रा येथील अमृत नगर परिसरात घडली. जैद सय्यद नावाच्या व्यक्तीने चिराग मॅन्शन इमारतीच्या टेरेसवर कुत्रा पाळला होता. मंगळवारी दुपारी हा कुत्रा पाचव्या मजल्यावरून एका तीन वर्षाच्या निरागस मुलीवर पडला. त्यामुळे मुलगी पूर्णपणे बेशुद्ध झाली. तिची आई ताबडतोब मुलीला रुग्णालयात घेऊन गेली. मात्र, तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच प्राणीप्रेमी मुजना यांनी जखमी कुत्र्याला तातडीने उचलून रुग्णालयात नेले. घटनेची माहिती मिळताच मुंब्रा पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. या संपूर्ण प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहेत.

उडालेल्या रिअ‍ॅक्टरच्या तुकड्याने होत्याचं नव्हतं

दरम्यान, बदलापूरच्या मानकिवली एमआयडीसीतील रेअर कंपनीमध्ये झालेल्या स्फोटामुळे परिसरात राहणारे मिस्त्री कुटुंबीय उद्ध्वस्त झाले आहेत. या कंपनीतील एक पार्ट त्यांच्या घरावर उडाल्याने धनश्री मिस्त्री यांचा एका पायाला जबर जखम झाली, तर घनश्याम मिस्त्री यांचे दोन्ही पाय तुटले आहेत, तर चिमुकलीही जखमी झाली आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

सोमवारी पहाटेच्या सुमारास बदलापूर शहरातील मानकिवली एमआयडीसीत रेअर फार्मा या कंपनीत भीषण स्फोट झाले. पहाटे सव्वाचार वाजताच्या सुमारास दोन स्फोट झाल्याने मानकिवलीसह खरवई आणि बदलापूर शहरातील काही परिसर हादरला होता.

Source link

Chirag Mansion Building Fell Dog Girl Diesthane latest newsthane mumbra dog fell girl diesकुत्रा पडला मुलीचा मृत्यूठाणे ताज्या बातम्याठाणे मुंब्रा कुत्रा पडला मुलीचा मृत्यूमुंब्रा चिराग मॅन्शन इमारत कुत्रा पडला
Comments (0)
Add Comment