Video: ‘कार हळू चालव…’ सांगितल्याचा राग, मागून भरधाव गाडी नेत तरुणाला चिरडण्याचा प्रयत्न

ठाणे : कल्याण पूर्वेतील विशाल नगरी परिसरात राहनारा तरुण रोहन शिंदे आपल्या एका मित्रासोबत दुचाकीमध्ये पेट्रोल टाकण्यासाठी उल्हासनगरमधील हिरा घाट पेट्रोल पंपच्या दिशेने चालला होता. रस्त्यावर एका चारचाकी कारने रोहनच्या बाईकला कट मारला. रोहनने गाडी पुढे घेत कार चालकाला हळू चालवण्यास सांगून ते पुढे निघून गेले. हिरा घाट परिसरात कारचालक त्यांच्या पाठीमागे आला. त्याने रोहनच्या बाईकला धडक दिली. रोहन खाली पडला इतकेच नव्हे कार चालकाने रोहनच्या अंगावर कार घालण्याचा प्रयत्न केला दोनदा कार चालक्याने कार फिरवली.रोहन पेट्रोल पंप कार्यालयात पळत गेल्याने बचावला. या प्रकरणी रोहन आणि त्याचे नातेवाईक तक्रार द्यायला उल्हासनगर येथील सेंट्रल पोलीस स्टेशनला गेले. मात्र, पोलिसांनी सीसीटीव्ही असून देखील गुन्हा दाखल केला नाही. अद्याप सेंट्रल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

Thane News: बिल्डिंगखालून जाताना अंगावर कुत्रा पडला, तीन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू; घटना cctvमध्ये कैद

ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथे एका पाच मजली इमारतीतून तीन वर्षीय मुलीवर कुत्रा पडला. त्यामुळे उपचारादरम्यान मुलीचा मृत्यू झाला. मुलगी तिच्या आईसोबत रस्त्याने चालली होती, तेव्हा अचानक बिल्डिंगवरून एक कुत्रा तिच्या अंगावर पडला. या घटनेत कुत्राही जखमी झाला आहे. ज्याला एका प्राणीप्रेमी महिलेने उपचारासाठी रुग्णालयात नेले. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओही समोर आला आहे.

संपूर्ण घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद

सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. लोक रस्त्यावरून ये-जा करत आहेत. यादरम्यान ही मुलगीही तिच्या आईसोबत जात आहे. मुलगी पाच मजली इमारतीखालून जात असताना एक कुत्रा वरून खाली पडताना दिसतो, जो थेट मुलीवर पडतो. त्यामुळे मुलगी बेशुद्ध होते. त्याचवेळी कुत्राही खाली पडल्यानंतर काही वेळाने उठतो आणि जमिनीवरून उठून रस्त्याच्या कडेला जातो.

कुत्रा अंगावर पडल्याने मुलगी बेशुद्ध झाली

ही घटना मुंब्रा येथील अमृत नगर परिसरात घडली. जैद सय्यद नावाच्या व्यक्तीने चिराग मॅन्शन इमारतीच्या टेरेसवर कुत्रा पाळला होता. मंगळवारी दुपारी हा कुत्रा पाचव्या मजल्यावरून एका तीन वर्षाच्या निरागस मुलीवर पडला. त्यामुळे मुलगी पूर्णपणे बेशुद्ध झाली. तिची आई ताबडतोब मुलीला रुग्णालयात घेऊन गेली. मात्र, तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच प्राणीप्रेमी मुजना यांनी जखमी कुत्र्याला तातडीने उचलून रुग्णालयात नेले. घटनेची माहिती मिळताच मुंब्रा पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. या संपूर्ण प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहेत.

Source link

kalyan car driver blows bikekalyan hira ghat petrol pump accidentthane accident newsthane hit and run caseकल्याण कारचालकाने बाईकला उडवलंकल्याण हिरा घाट पेट्रोल पंप अपघातठाणे अपघात बातम्याठाणे हिट अँड रन केस
Comments (0)
Add Comment