रक्षाबंधनपूर्वीच बहि‍णींना मिळणार ओवाळणी! लाडकी बहीण योजनेचा पहिला हफ्ता ‘या’ तारखेला मिळणार

मुंबई : सीएम शिंदे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा करत बजेटमधून महिलांना एक मोठे गिफ्ट दिले. लाडकी बहीण योजेनंनतर मागील दोन महिने विरोधकांकडून योजनेवर आरोपप्रत्यारोप होवू लागले. तसेच अर्ज भरताना अनेक महिलांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला. अशातच सरकारने सुद्धा योजना प्रत्येक महिलेपर्यंत पोहचावी यासाठी कंबर कसली. अवघ्या दोन महिन्यात राज्यातील एक कोटी ३९ लाख ९४ हजार ३४५ महिलांचे योजनेसाठी अर्ज आले आहेत.
Majhi Ladki Bahin Yojana: आता जो तो आम्हाला विचारतोय…; भाजपच्या ‘लाडकी बहीण’ पोस्टरवरील महिला भडकल्या, जाब विचारला

यासह सरकारने सुद्धा योजनेतील अनेत अटी कमी करत महिलांना आणखी सुलभ प्रक्रिया उपलब्ध करुन दिली आहे. ३१ ऑगस्टपर्यंत महिलांना लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करता येणार आहे. अशातच आता लाडकी बहीण योजनेत नोंदणी केलेल्या बहि‍णींना यंदा रक्षाबंधनच्या आधीच सरकारकडून ओवाळणी मिळणार आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पहिला हफ्ता १७ ऑगस्टाला वितरित करण्यात येणार आहे. १७ ऑगस्टला भव्य दिव्य कार्यक्रम सरकारच्या वतीने घेण्यात येणार आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळात यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. सीएम शिंदे सह दोन्ही उपमुख्यमंत्री आणि प्रत्येक जिल्ह्यातील पालकमंत्री आपापल्या जिल्ह्यातून ऑनलाईन हजर राहतील. साधार योजनेचा पहिला हफ्ता ३००० हजार रुपये असे मिळून महिलेच्या बँक खात्यात येतील. एक ते दोन कोटी महिलांना पहिला हफ्ता वाटप करण्यात येईल.

राज्यात लाडकी बहीण योजनेसाठी एक कोटी ३९ लाखांहून अधिक महिलांनी अर्ज केले आहेत. या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. येत्या रक्षाबंधनाला महिलांच्या खात्यात रक्कम जमा करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. राज्यात पुणे जिल्ह्यात नऊ लाख ७२ हजार ८५६ महिलांनी जणांनी अर्ज केले आहेत. त्या पाठोपाठ नाशिक जिल्ह्यात सात लाख ३७ हजार ४८२, नगर जिल्ह्यातून सात लाख आठ हजार ८९१, सोलापूरमधून सहा लाख १५ हजार २३, नागपूर जिल्ह्यातून पाच लाख ७९ हजार १९२ महिलांनी जणांनी अर्ज केले आहेत. सातारा जिल्ह्यातून पाच लाख २० हजार ६०५, ठाण्यातून पाच लाख ४७ हजार ८४८ जणांनी अर्ज केले आहेत. त्यामुळे सर्वाधिक अर्ज करण्यात पुणे अव्वल असून, सर्वाधिक कमी अर्ज हे मुंबई शहर, सिंधुदुर्ग, वर्धा, वाशिम, रत्नागिरी, गडचिरोली, धाराशिव या जिल्ह्यांमधून करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

Source link

cm ladki bahin yojnacm shindeladki bahin yojna latest newsmaharashtra govtमहाराष्ट्र लाडकी बहिण योजना माहितीलाडकी बहीण योजनालाडकी बहीण योजना फॉर्मलाडकी बहीण योजना हफ्ता
Comments (0)
Add Comment