Panzara River : पूर आलेल्या नदीत, तरुणाची पुलावरुन उडी; २४ तासांहून अधिक चालले शोधकार्य

धुळे, अजय गर्दे : शहरातील पांजरा नदीवरील मोठ्या पुलावरून मंगळवारी ६ ऑगस्ट रोजी दुपारी पाच वाजेच्या सुमारास अचानक एका तरुणाने पांजरा नदी पात्रामध्ये उडी घेतली हा प्रकार नजीकहून जाणाऱ्या एका इसमाने पाहिला आणि तात्काळ पोलीसांना कळवले. तरुण पांजरा नदी पात्रात बुडाला असल्याचा अंदाज लावण्यात येत आहे, या तरुणाला पोलीस प्रशासनासह अग्निशमन विभागाच्या पथक काल पासून शोधण्याचा प्रयत्न करत होते, परंतु पाण्यात बुडालेल्या तरुणाचा कुठल्याही प्रकारे थांगपत्ता अग्निशमन विभागाच्या जवानांना काल पासून लागत नव्हता, काल संध्याकाळी उशिरापर्यंत बुडालेल्या तरुणाचे शोधकार्य सुरू होते, परंतु त्यानंतर मात्र काल शोधकार्य उशीरा रात्री थांबवण्यात आले होते.

सकाळी पुन्हा एकदा प्रशासनातर्फे बुडालेल्या तरुणाचा शोध घेण्यासाठी बचाव कार्य हाती घेण्यात आले. पोलीस प्रशासन देखील घटनास्थळी दाखल झाले होते, परंतु बुडालेल्या तरुणाची कुठल्याही प्रकारे माहिती पोलीस प्रशासनाला दुपारपर्यंत सुद्धा मिळू शकली नाहीये, अशी माहिती अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांतर्फे देण्यात आली होती..
Dhule News: घराबाहेर खेळताना अनर्थ, सर्पदंशाने दोन चिमुकल्यांचा अंत; कुटुंबियांचा आक्रोश

आढळून आला मृतदेह…

मात्र आज संध्याकाळी उशीरा धुळे शहरातील पांजरा नदी पात्रामध्ये वार कुंडाणे शिवारात एका तरुणाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला, मंगळवारी रोजी संध्याकाळच्या सुमारास याच तरुणाने धुळे शहरातील मोठ्या पुलावरून उडी घेतल्याचे परिसरातील काही नागरिकांच्या निदर्शनास आले आणि त्यांनी प्रशासनाला माहिती दिली. धुळे महानगरपालिकेच्या अग्निशामक विभागातर्फे याच तरुणाला शोधण्यासाठी पथक नदीपात्रात काल पासून बचावकार्य करत होते. धुळे शहरापासून काही अंतरावर असलेल्या वारकुंडाने शिवारात तरुणाचा पाण्यावर तरंगत असलेला मृतदेह आढळून आल्याने आता पोलीसांनी सुद्धा बचावकार्य थाबंवले आहे.


पंरतु मृत तरुणाची अद्यापही ओळख पटलेली नाही याच संदर्भात पुढील तपास पोलीस प्रशासनातर्फे करण्याचे काम सुरू आहे. महानगरपालिकेच्या अग्निशामक विभागातर्फे याच तरुणाला शोधण्यासाठी काल पासून बचावकार्य सुरु होते अखेर त्यांच्या शोधकार्यावा यश आले. याच तरुणाला तपासणीसाठी हिरे वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस प्रशासनातर्फे करण्यात येत आहे नेमकी का उडी मारला याचा शोध घेणे सुरु आहे.

Source link

dhule newsdhule panzara river newspanzara river floodpanzara river flood updateधुळे पाजंरा नदीनदीत तरुणाची उडीपांजरा नदीपांजरा नदी बातमी
Comments (0)
Add Comment