देवेंद्र फडणवीस काय म्हणाले
फडणवीस म्हणाले, मी एकाच टर्म मध्ये मुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेता आणि उपमुख्यमंत्री झालो. तर दादा उपमुख्यमंत्री विरोधी पक्ष नेते आणि नंतर परत उपमुख्यमंत्री झाले, पण एकनाथ शिंदे यांनी जो रेकॅार्ड केलाय तो कोणीच करु शकत नाही. सत्ता सोडून आमदारांना घेवून सत्ता स्थापन केली आणि हे फक्त तेच करु शकतात. त्यांचा संयमीपणा त्यांच्याकडून शिकण्यासारखा आहे. अनेक तास ते ऐकून घेतात पण त्यांचा संयम संपला की ते कोणाचे ऐकत नाहीत. एकनाथ शिंदे कधी झोपतात कधी उठतात हे त्यांच्या घरच्यांनाही माहिती नाही.या पुस्काच्या पुढील आवृत्तीत अजित पवारांना सह संपादक म्हणुन घ्यावे असा सुद्धा सल्ला फडणवीसांनी दिला.
अजित पवार काय म्हणाले
बारामतीला जातो तेव्हा पहाटे सहाला शेतात जातो परंतु मीडिया आमची फॅन नसल्याने आमचे फोटो व्हिडिओ येत नाही.देवेंद्र यांची टम १९९९ सुरुवात झाली शिंदे यांची २००० मध्ये कारकीर्द सुरु झाली यांच्यात सर्वात सिनियर मी आहे, माझी १९९० मध्ये राजकीय कारकीर्द झाली तरी मी मागे राहिलो अशी खदखद अजित पवारांनी बोलून दाखवली. मला जर संधी दिली असती तर मी पूर्ण पार्टी आणली असती त्यांनी तर फक्त आमदराच आणले आता वेळ निघून गेली. मी अनेक मुख्यमंत्री बघितले परंतु इतका माणसात मिसळून काम करणारा मी नाही पाहिला कधी कधी मीच वैतागतो ही कॅबिनेट आहे की काय? असे अजित पवार म्हणाले.