Ladki Bahin Yojna : योजना पॉप्युलर झालीय, सावत्र भावापासून सावध रहा; बहिणींना शिंदेंचा सल्ला

मुंबई : राज्याचे सीएम एकनाथ शिंदे यांच्यावर प्रा.डॉ. प्रदीप ढवळ यांनी पुस्तक लिहले आहे. पुस्तकाचे आज प्रकाशन करण्यात आले. “योध्दा कर्मयोगी एकनाथ संभाजी शिंदे” असे पुस्तकाला शीर्षक देण्यात आले आहे. ठाण्यातील गडकरी रंगायतन इथे पुस्तक प्रकाशन सोहळा पार पडला आहे. या कार्यक्रमादरम्यान सीएम शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेवर भाष्य केले. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना इतकी पॉप्युलर झालीय, की लाडक्या बहिणी येतात आणि राख्या बांधतात, हात भरून जातात. रक्षाबंधनच्या आधी लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा होतील, मात्र बहिणींना हेच सांगेल की सावत्र भावा पासून सावध रहा असा खोचक टोला महाविकास आघाडीला सीएम शिंदेंनी लगावला. बाळासाहेब ठाकरे आनंद दिघे यांच्या पश्चात मला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची साथ लाभली,शरीरात रक्ताचा थेंब असे पर्यंत लोकांसाठी काम करणार असे ठाण्यात पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात सीएम शिंदे म्हणाले.
सीएम शिंदेंवर आले पुस्तक! अजितदादा अन् फडणवीसांनी बोलून दाखवली खदखद, उपस्थितींमध्ये पिकला हशा

सीएम शिंदेंवर आले पुस्तक

मी मुख्यमंत्री होण्याचा आधीच ढवळ सरांनी पुस्तक लिहत असल्याचे सांगितले होते, मी त्यांना होकार दिला होता. माझ्या सारख्या कार्यकर्त्याला नाही म्हणावल नाही, मी अनेक पुस्तकं प्रकाशन केली, माझ्यासाठी हाही क्षण आनंदाचा आहे, माझ्यावर लिहिलेलं पुस्तक प्रकाशन होतंय, त्यामुळे हा क्षण थोडा वेगळा, माझे भाषण करणे देखील अवघडून टाकणारे आहे. हे जे काही आहे, तो क्लायमॅक्स नाही, इंटरवल नाही हा ट्रेलर आहे.

कोण किती काम करते, नेत्यांनी वाचला पाढा

रात्री उशिरा पर्यंत मी आणि देवेंद्रजी काम करतो, आणि पहाटे अजितदादा काम सुरू करतात असे सीएम शिंदे म्हणाले. तर एकनाथ शिंदे कधी झोपतात कधी उठतात हे त्यांच्या घरच्यांनाही माहिती नाही असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. यापुढे जावून अजितदादांनी सुद्धा टिप्पणी केली.


बारामतीला जातो तेव्हा पहाटे सहाला शेतात जातो परंतु मीडिया आमची फॅन नसल्याने आमचे फोटो व्हिडिओ येत नाही.देवेंद्र यांची टम १९९९ सुरुवात झाली शिंदे यांची २००० मध्ये कारकीर्द सुरु झाली यांच्यात सर्वात सिनियर मी आहे, माझी १९९० मध्ये राजकीय कारकीर्द झाली तरी मी मागे राहिलो अशी खदखद अजित पवारांनी बोलून दाखवली.

Source link

ajit pawarcm shinde bookDevendra FadnavisEknath Shindeएकनाथ शिंदेप्रदीप ढवळयोद्धा कर्मयोगी एकनाथ संभाजी शिंदेसीएम एकनाथ शिंदे
Comments (0)
Add Comment