महेश पाटील, नंदुरबार : विजेच्या लाईनचे काम सुरू असताना मुख्य विद्युत वाहिनीला स्पर्श होऊन जोरदार धक्का लागून दोन कंत्राटी कामगारांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशिकच्या चांदवड तालूक्यातील विटावे येथे ६ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली आहे. दोघेही मृत तरुण नंदूरबार जिल्ह्यातील शहादा आणि अक्कलकुवा तालुक्यातील आहेत. घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी चांदवड रुग्णालयात प्रचंड आक्रोश केला. दोघांचे मृतदेह शवविच्छेदन करुन बुधवारी त्यांच्या गावी आणण्यात आले आहेत.
सुनिल खुमा वळवी (वय, २२) रा. आशिष नगर ता. शहादा आणि केवलसिंग सोत्या पाडवी (वय, २७) रा. देवमोगरा पुनर्वसन ता. अक्कलकुवा अशी मृत्यू झालेल्या तरुणांची नावं आहे. दोघे मजूर इलेक्ट्रॉनिक लाईटचे पोल उभे करुन त्यावर ई केबल पसरवण्याचं काम करत होते. त्यावेळी मंगळवारी ६ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता दोघं एचटी आणि एलटी लाइनच्या खाली काम करत होते. धोक्याची जाणीव असतानाही कॉन्ट्रॅक्टर पवार यांनी मजुरांना कामासाठी आवश्यक असणारी योग्य ती सुरक्षात्मक विद्युतरोधक साधनं पुरवली नव्हती.
लाईट बंद करतात त्यावेळी केंद्राला कळवलं जातं. त्यानंतर संबंधित पोलवर चढणाऱ्याला लाईट बंद केल्याचं सांगितलं जातं. मात्र वायरमन उज्ज्वल मधुकर ढेमे यांनी एचटी लाईन बंद न करताच, लाईन बंद केली आहे, असं फोनद्वारे कळवलं. त्यामुळे भर पावसात काम सुरू असताना विजेचा शॉक लागून दोघांचा जागीच मृत्यू झाला. नातेवाईकांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे. बुधवारी संध्याकाळी त्यांच्या गावी दोघांवर अंत संस्कार करण्यात येणार आहेत.

याप्रकरणी गणेश रामा पाडवी रा. देवमोगरा पुनर्वसन ता. अक्कलकुवा यांच्या फिर्यादीवरुन दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी चांदवड पोलीस ठाण्यात कॉन्ट्रॅक्टर दत्तू नामदेव पवार रा. रामपूर ता. चांदवड, वायरमन उज्ज्वल मधुकर देने रा. चांदवड, ट्रॅक्टर चालक भावराव रमण खुरसणे रा. रायपूर ता. चांदवड या तिघांविरुद्ध बीएलएम कलम १०५,३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस निरीक्षक कैलास वाघ तपास करत आहेत.