एरंडोल येथे सिमेंट बाकांचे लोकार्पण व महिला सन्मान सोहळा संपन्न..!

एरंडोल :- येथे दि. १८ ऑक्टोंबर रोजी राजे छत्रपती संभाजी ग्रुप तर्फे शहीद जवान राहुल लहु पाटील यांच्या स्मरणार्थ सिमेंट बाकांचे लोकार्पण व विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान सोहळा पार पडला. समाजसेवक ईश्वर बि-हाडे यांच्या स्वखर्चातुन १० सिमेंट बाक रहीवाश्यांना बसण्यासाठी देण्यात आले त्यांचे लोकार्पण माजी पालकमंत्री सतिषराव भास्कर पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.


यावेळी विविध क्षेत्रातील १५महिलांचा शाल व सन्मानपत्र देवुन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किशोरभाऊ काळकर (उत्तर महाराष्ट्र संघटनमंत्री ,भाजपा) हे होते.प्रमुख पाहुणे म्हणुन नगराध्यक्ष रमेश परदेशी,माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी,राष्ट्रवादी गटनेत्या सौ. सरलाताई पाटील,राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष तथा नगरसेवक मनोज पहेलवान,शालीकभाऊ गायकवाड,नगरसेवक नितीन(बबलू)चौधरी,अस्लम पिंजारी,डाँ सुरेश पाटील, अभिजित पाटील,सुनिल चौधरी, पारोळा पं.स.मा.सभापती मनोराज पाटील,बी.जी लोहार,सुरेखा चौधरी,अँड अहेमद सैय्यद,राजेंद्र शिंदे,आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन छत्रपती राजे संभाजी ग्रुपचे अध्यक्ष ईश्वरभाऊ बि-हाडे यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिपक पाटील,शरद भावसार,संभाजी देवरे,प्रविण पाटील,अमोल बडगुजर,संजय नेटके,नितीन सोनार,संदिप आरखे,भागवत ओतारी,धनराज मोरे,संतोष मोरे,अशोक चव्हाण,राहुल नेटके,राजेश सोनार,उमाकांत बडगुजर,प्रमोद शुक्ला,अनिल महाजन,योगेश भावसार, गनी मिस्तरी आदींनी परिश्रम घेतले.

Erandoljalgaon newsncpमुंबईशरद पवार
Comments (0)
Add Comment