कुस्ती सोडण्याचा विनेशचा निर्धार पक्का, अशोक चव्हाणांना समर्थकाचा धक्का, सकाळच्या दहा हेडलाईन्स

१. पॅरिस ऑलिम्पिकमधील महिलांच्या ५० किलो वजनी गटातील फ्रीस्टाईल कुस्तीच्या अंतिम फेरीत अपात्र ठरल्यानंतर विनेश फोगाट हिचा कुस्तीला अलविदा, ट्विटरवर पोस्ट लिहित विनेशचा भारतीय चाहत्यांच्या हृदयात कालवाकालव करणारा निर्णय

२. विनेश फोगाटचे रौप्य पदक विजेत्याप्रमाणे स्वागत आणि सत्कार होणार, सन्मान आणि बक्षिसांचा मानही तसाच, हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सैनी यांची घोषणा, इथे क्लिक करुन वाचा सविस्तर

३. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जीवनपट उलगडणाऱ्या ‘योद्धा कर्मयोगी’ पुस्तकाचे प्रकाशन, मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री गंगूबाई शिंदे यांच्या आवाजातील व्हिडिओ दाखवला, तुझ्या डोळ्यातील अश्रू मला दिसत आहेत, मी इथेच आहे, आईचे शब्द ऐकून शिंदे भावूक

४. दिल्ली दौऱ्यावर असलेल्या उद्धव ठाकरेंच्या काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांशी भेटीगाठी, महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याबद्दल सूचक विधान, मुख्यमंत्रिपदाचा चेहरा होण्यास तयार असल्याचेही सूचक संकेत

५. अशोक चव्हाण यांचे अत्यंत विश्वासू, माजी पालकमंत्री डी. पी सावंत यांची काँग्रेसकडून विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा, नांदेड उत्तरमधून निवडणूक लढवण्यासंदर्भात काँग्रेसकडे अर्ज, सावंतांच्या भूमिकेने भुवया उंचावल्या, चव्हाणांना मोठा धक्का, वाचा सविस्तर

६. आईसोबत चालताना पाच वर्षांच्या मुलीवर इमारतीच्या गच्चीतून कुत्रा पडला, आठ वर्षांनी बाळ झालेल्या दाम्पत्याची कूस रिकामी, उपचारादरम्यान सना खान हिचा मृत्यू, मुंब्रा शहरातील अमृतनगर परिसरात घडलेल्या घटनेने हळहळ

७. अनुसूचित जाती व जमातींच्या जातवैधता प्रमाणपत्र मिळण्यातील अडचणी दूर, महायुती सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णयाला हिरवा कंदील, प्रमाणपत्र देणे आणि पडताळणी विनियम २००० मध्ये सुधारणा करण्याच्या निर्णयास बैठकीत मान्यता

८. महाराष्ट्र लॉजिस्टिक धोरण २०२४ ला राज्य मंत्रिमंडळाची अखेर मान्यता, राज्याला येत्या पाच वर्षांत तीस हजार कोटींचे उत्पन्न मिळणार, सुमारे पाच लाख प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगारनिर्मितीही शक्य

९. ठरलं तर मग मालिकेत प्रतिमाच्या अंगावर जात खोट्या तन्वीचा लाळघोटेपणा, अस्मितासोबत मिळून सायलीला घराबाहेर काढण्याचं प्लॅनिंग सुरु, तर प्रतिमाच्या खोट्या डेड बॉडीवरुन अर्जुन-चैतन्य लागले तपासाला

१०. बांगलादेशातील अराजकाच्या पार्श्वभूमीवर नोबेल पुरस्कार विजेते अर्थशास्त्रज्ञ प्रा. मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील हंगामी सरकारचा शपथविधी आज रात्री ८ वाजता होणार, सल्लागार मंडळात १५ सदस्यांचा समावेश

Source link

Breaking Newstoday breaking newstoday headlinestop 10 headlinestop 10 headlines newstop 10 latest newsआजच्या ठळक बातम्याआजच्या बातम्याटॉप 10 ताज्या बातम्याठळक बातम्या
Comments (0)
Add Comment