डोळ्यात त्रास, तपासताच डॉक्टर हादरले; २ तास ऑपरेशन अन् महिलेच्या डोळ्यातून ६० अळ्या काढल्या

बुलढाणा: शरीराचा प्रत्येक अवयव हा महत्त्वाचा असतो आणि त्यातही डोळे हे अत्यंत अवयवांपैकी एक मानले जातात. पण अनेकदा आपण डोळ्यांची काळजी घेण्यात हलगर्जीपणा करतो. असाच हलगर्जीपणा एका महिलेच्या जीवावर बेतता बेतता राहिला. या घटनेने डॉक्टरही आश्चर्यचकित झाले आहेत.

बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील मालगणी येथील ज्योती गायकवाड या महिला रुग्णाच्या डोळ्यातून चक्क ६० जिवंत अळ्या काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चिखली येथील प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. स्वप्नील मोरवाल यांनी या महिलेच्या डोळ्यातून ६० जिवंत अळ्या काढल्या आहेत आणि या महिलेचा डोळा खराब होण्यापासून वाचविला आहे. या अळ्या काढताना डॉक्टर यांना तब्बल दोन तासांचा वेळ लागला असून त्यांना अत्यंत सावधपणे एक-एक अळी काढावी लागली. मोरवाल हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी ही शस्त्रक्रिया केली.Dombivli Crime: पत्नीसह मित्रांकडून छळ अन् ब्लॅकमेलिंग, हताश पतीचं टोकाचं पाऊल, चिठ्ठीत संतापजनक माहिती

मातीचे ढेकूळ आणि झाल्या डोळ्यात अळ्या

विशेष म्हणजे या महिलेकडून डॉक्टर स्वप्नील मोरवाल यांनी कुठलीही फी सुद्धा घेतलेली नाही. मोलमजुरी करणाऱ्या या महिलेला शेतात काम करताना अचानक डोळ्यात मातीचे ढेकुळ लागले होते. तेव्हापासून डोळ्यात त्रास होत होता. सुरुवातीला तिने याकडे दुर्लक्ष केलं. मात्र त्रास जास्त वाढल्यावर या महिलेने डॉ. स्वप्नील यांच्याकडे जाऊन डोळे तपासले. तेव्हा त्यांच्या डोळ्यात अळ्या झाल्याचं डॉक्टरांना समजलं. डॉक्टरांनी तात्काळ त्या अळ्या काढण्याचं ठरवलं.

मुख्य म्हणजे ग्रामीण भागातील महिला असून देखील कोणताही घरगुती इलाज न करता त्या थेट तज्ज्ञ डॉक्टरांकडे गेल्याने त्या महिलेचे डोळे वाचून शकले, असं म्हणता येईल. याप्रकणात कोणतीही दिरंगाई किंवा चूक ही जीवावर बेतू शकली असती. त्यामुळे प्रत्येकाने घरगुती ईलाजात वेळ न दवडता थेट डॉक्टरांकडे जाणे किती गरजेचे आहे यावरून दिसून येते.

शस्त्रक्रियेनंतर महिलेची प्रकृती ठीक असून तिला कोणताही त्रास जाणवत नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. परंतु चक्क डोळ्यांमध्ये एक मातीचे ढेकळ आणि त्यामध्ये ६० अळ्या यामुळे डॉक्टर देखील काही काळ हादरले होते. एकंदरीत या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे डॉक्टरांवर अभिनंदन याचा वर्षाव होत आहे.

Source link

60 larvae in womans eyeBuldhanabuldhana newsbuldhana shocking casetrending newsबुलढाणाबुलढाणा बातम्यामहिलेच्या डोळ्यात अळ्यामहिलेच्या डोळ्यातून ६० अळ्या काढल्या
Comments (0)
Add Comment