पुणे : तब्बल नऊ लाख पुणेकरांच्या ये-जा करण्याचा रस्ता असणाऱ्या सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडीचे ग्रहण काही केलं सुटायचं नाव घेत नाही. सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून तीन वर्षांपूर्वी उड्डाणपुलाचं काम सुरू झालं. मात्र त्यातील राजाराम पुलावरील एकेरी उड्डाणपूलाचं काम पूर्ण झालेलं असताना त्याचं उद्घाटन करण्याअभावी ही वाहतूक कोंडी अजूनच वाढली आहे.यावरूनच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आक्रमक झाला आहे. ”१२ तारखेपर्यंत या उड्डाणपूलाचं उद्घाटन नाही केल्यास १३ तारखेला आम्ही कितीही पोलीस बंदोबस्त असला तरी हा उड्डाणपूल खुला करणार” असल्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिला आहे.
पुणेकरांच्या मतावर महापालिका, विधानसभा लोकसभा निवडून येण्यासाठी उड्डाणपूलाचे काम लांबवण्यात आलं. मागच्या दोन महिन्यापूर्वीच या उड्डाणपुलाचे काम पूर्ण झालं आहे. मात्र फक्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या उद्घाटनाला येता यावं यासाठी स्थानिक आमदार माधुरी मिसाळ आणि भीमराव तापकीर यांच्या हट्टापोटी महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले हा उड्डाणपूल खुला करण्याचं लांबवत आहेत. ”पुढच्या चार दिवसांत तुम्ही देवेंद्र फडणवीस यांना आणा. नरेंद्र मोदींना आणा नाहीतर, जो बायडन यांना आणा आणि हा उड्डाणपूल खुला करा. नाहीतर १३ तारखेला आम्ही कितीही पोलीस बंदोबस्त असला तरी वाहतूकसाठी खुला करणार. आयुक्त राजेंद्र भोसले यांनी आता देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारचा दबाव झुगारून लावावा” अशी विनंती आहे. असं प्रशांत जगताप म्हणाले आहेत.

दरम्यान, सिंहगड रस्त्यावरून जवळपास नऊ लाख नागरिक दररोज ये जा करतात. या रस्त्यावर असलेले फन टाईम थेटर ते राजाराम पूल हे अवघ्या दहा मिनिटांचं अंतर पार करण्यासाठी नागरिकांना जवळपास एक तास लागतो. मात्र या वाहतूक कोंडीकडे लक्ष देण्यास प्रशासनाला वेळचं नाहीये. शहरात सगळीकडे खड्डे बुजवण्याचे काम जोरात सुरू आहे. मात्र याला सिंहगड रोड अपवाद ठरला आहे. सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूने मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे वाहतूक कोंडीत भर पडली आहे. पण यावर ना नेता, ना पदाधिकारी, ना आमदार-खासदार कोणीच प्रशासनाला जाब विचारण्यासाठी तोंडातून शब्द काढण्यास तयार नाही. त्यामुळे आता नागरिकांमध्ये रोष दिसत आहे.