मुंबई : शहरात मोठ्या प्रमाणात असलेले गाई, म्हशींचे तबेले लवकरच हद्दपार होणार आहेत. तबेलेमुक्त शहर करण्यासाठी त्यांचे मुंबईबाहेर स्थलांतर करण्याच्या दिशेने मुंबई महापालिकेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. सध्या मुंबईत २६३ तबेले असून पालघर येथील दापचेरी येथे त्यांचे स्थलांतर करण्यासाठी महापालिकेत हालचालींना वेग आला आहे. यासाठीच्या नोटीसचा मसुदा मुंबई महापालिका आयुक्तांकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. त्यावर निर्णय होताच तबेल्यांच्या मालकांना ‘महाराष्ट्र नागरी क्षेत्र गुरे पाळणे व ने-आण करणे (नियंत्रण अधिनियम १९७६)’ या कायद्यानुसार महापालिकेतर्फे नोटीस पाठवण्यात येणार असून त्यानुसार कारवाई होणार आहे.मुंबईत २००५ पूर्वी तबेले मालकांना लायसन्स मिळत होते. नंतर तबेलेमुक्त शहर करण्याचा निर्णय झाला. यासंदर्भात संबंधित संघटना न्यायालयात गेल्या. शहरात तबेले नको, अशी भूमिका घेताना उच्च न्यायालयबरोबरच सर्वोच्च न्यायालयानेही निर्णय दिला होता. २६ जुलै २००५ मध्ये मुंबई महापूर आला आणि यामध्ये विविध ठिकाणी असलेल्या तबेल्यातील शेकडो गाई-म्हशी बुडून मरण पावल्या होत्या. त्यानंतर मुंबईतील तबेले शहराबाहेर हलविण्याची मागणी अधिक जोर धरू लागली होती. त्यामुळे महापालिकेनेही परवाने देणे बंद केले होते. बहुतांश तबेले हे जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारीतील जागांवरच आहेत. त्यामुळे या जागा रिक्त करण्यासाठी राज्यस्तरावर तसेच मुंबई महापालिकेकडूनही प्रयत्न होत आहे. राज्य सरकारकडूनही मुंबई महापालिकेकडे पत्रव्यवहार करून आमच्या अखत्यारीतील जागांवरील तबेले हटविणे शक्य नसून महापालिकेने त्याविरोधात कारवाई करावी, असे स्पष्ट केल्याची माहिती मुंबई महापालिकेतील सूत्रांनी दिली.
त्यामुळे आता मुंबई महापालिका तबेलेमुक्त शहर करण्यासाठी प्रयत्न करणार असून त्यासाठी हालचालींना वेग आला आहे. सध्या मुंबईत २६३ तबेले आहेत. यामध्ये लायसन्सधारक ५९ आणि लायसन्स नसलेले २०४ तबेले आहेत. या सर्व तबेल्यांना हटवण्यासाठी आधी नोटीस पाठवली जाणार असून त्याचा मसुदा मुंबई महापालिका आयुक्तांकडे मंजुरीसाठी पाठवल्याचे सांगण्यात आले. गोरेगाव, मालाड या पट्ट्यात सर्वाधिक, म्हणजे ६८ तबेले आहेत. त्या पाठोपाठ सांताक्रूझ पूर्वमध्ये २२, अंधेरी पूर्वमध्ये २७, कांदिवली पूर्वेला २४, घाटकोपरमध्ये २३, भांडुपमध्ये १८, कुर्ला, गोवंडी, चेंबूर या भागांत ३९ तबेले आहेत. तर मुलुंड, अंधेरी पश्चिम, खार, वांद्रे, आदी भागांतही गाई-म्हशींचे तबेले आहेत.
आरेमधील तबेल्यांना परवानगी

मुंबईतील तबेल्यांत एकूण ९ हजार ९५९ गाई-म्हशी असल्याची नोंद मुंबई महापालिकेकडे आहे. हे सर्व तबेले पालघरमधील दापचेरी येथे स्थलांतरित करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. त्यासाठी लवकरच नोटीस पाठवली जाणार असून त्याआधी तबेल्यांच्या मालकांशीही चर्चा करण्याचा प्रयत्न असल्याचे सूत्रांनी सांगितले. काही तबेले हे आरेतील वन विभागाच्या जागांवरही आहेत. मात्र ते शहराबाहेर असून त्यांना परवानगी असल्याने त्यांचे स्थलांतर होणार नाही.