आजी-माजी आमदार आमनेसामने; भाजपच्या दोन गुजराती नेत्यांमध्ये जुंपली, पक्षाची चिंता वाढली

मुंबई: विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आली आहे. जागावाटपावरुन महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात शह काटशह सुरु आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जागावाटपावरुन दावे प्रतिदावे केले जात आहेत. पण मुंबईतील एका मतदारसंघात भाजपच्याच दोन नेत्यांमध्ये संघर्ष सुरु झाला आहे. आजी माजी आमदारांनी विधानसभेची तयारी सुरु केल्यानं संघर्ष पेटला आहे.

२०१९ मध्ये घाटकोपरमधून भाजपनं पराग शहांना तिकीट दिलं. पेशानं बिल्डर असलेले शहा निवडून आले आणि आमदार झाले. भाजपनं आमदार प्रकाश मेहतांचं तिकीट कापून शहांना संधी दिली होती. आता विधानसभा निवडणूक तोंडावर आलेली असताना दोघांनी तयारी सुरु केली असून त्यामुळे भाजपची चिंता वाढली आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना प्रकाश मेहता त्यांच्या मंत्रिमंडळात गृहनिर्माण खातं सांभाळत होतं. ते बऱ्याच वर्षांपासून भाजपमध्ये आहेत. मात्र तरीही २०१९ मध्ये त्यांना डावलून शहांना संधी देण्यात आली.
Sharad Pawar: ऑक्सफर्डमधून शिक्षण, २७ वर्षीय समलिंगी तरुणावर पवारांकडून मोठी जबाबदारी, अनिश गावंडे कोण?
प्रकाश मेहता मित्र मंडळाकडून काही दिवसांपूर्वी एक भव्य सभा घेण्यात आली. या सभेला घाटकोपरमधील अनेक प्रतिष्ठित मंडळी उपस्थित होती. २०१९ प्रमाणे यंदाही मेहतांना डावलण्यात आलं तर कार्यकर्ते गप्प बसणार नाहीत, असा संदेश यातून पक्ष नेतृत्त्वाला देण्यात आला. शहा यांच्याबद्दल भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. ‘पराग शहा विकासक आहेत. ते आमच्यासाठी उपलब्ध नाहीत. त्यांच्याशी सहज संपर्क साधता येत नाही. मतदारसंघातही ते सक्रिय नसतात,’ अशी तक्रार एका स्थानिकानं बोलून दाखवली.

भाजपमधील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहा आणि मेहता यांच्यात सुरु असलेली रस्सीखेच पाहता पक्षाकडून प्रविण छेडा यांना तिकीट दिलं जाऊ शकतं. प्रविण छेडा आधी काँग्रेसमध्ये होते. ते माजी नगरसेवक आहेत. २०१९ मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. ते मतदारसंघात विविध आघाड्यांवर सक्रिय आहेत. त्यांचा जनसंपर्कही चांगला आहे. गुजराती समाजात त्यांचं वजन आहे. घाटकोपर मतदारसंघात गुजराती समाजाचं प्राबल्य आहे.

मेहता आणि शहा यांच्यात पक्षाचं नुकसान होऊ नये म्हणून भाजप तिसऱ्याच उमेदवाराची निवड करण्याची दाट शक्यता आहे. लोकसभेप्रमाणेच भाजप मुंबईत विधानसभेला नवे चेहरे देण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीला भाजपनं मुंबईतील तिन्ही खासदारांची तिकिटं कापली होती. तोच प्रयोग विधानसभेलादेखील होण्याची शक्यता आहे.

Source link

maharashtra assembly election 2024Maharashtra Political Newsparag shahprakash mehtapravin chedaकाँग्रेसघाटकोपर विधानसभाभाजपभाजप आमदारमहाराष्ट्र राजकीय बातम्या
Comments (0)
Add Comment